agriculture news in marathi Stormy rain in the Lohara | Page 2 ||| Agrowon

लोहाऱ्यात वादळी पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

लोहारा, जि. उस्मानाबाद : शहरासह तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे पाऊणतास जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जनावरे दगावली. 

लोहारा, जि. उस्मानाबाद : शहरासह तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (ता. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे पाऊणतास जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जनावरे दगावली. 

मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दररोज दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक असते. मात्र त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आभाळ भरून वादळी वारे सुटते. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. २५ एप्रिलला जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळ्यासारखी स्थिती आहे. बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अचानक पावसास सुरवात झाली. त्यानंतर पावसाचा वेग वाढत गेला.

मेघगर्जनेसह पाऊणतास वादळी पाऊस झाला. 
दरम्यान, तालुक्यातील जेवळी येथील बसस्थानक परिसरात झाडाखाली बांधलेल्या खोंडावर वीज कोसळली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. जेवळी पूर्वतांडा येथील शेतात झाडाखाली बांधलेली म्हैस, तर भोसगा येथील शेतात वीज कोसळल्याने गाय जागीच ठार झाली. तालुक्यातील मार्डी, कास्ती, नागराळ, बेंडकाळ, माकणी, धानुरी,  जेवळी, वडगाव, आष्टाकासार, कानेगाव, मोघा, हिप्परगा (रवा), माळेगाव, लोहारा, (खुर्द), उंडरगाव आदी भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. 

पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. बस्थानका जवळील परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहते झाले. या वादळी पावसाचा फळबागांसह काढून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले. सध्या आंबे उतरण्यास सुरवात केली असतानाच वादळी पाऊस झाल्याने कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जेवळी परिसरात गेल्या चार, पाच दिवसांपासून अधून मधून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. बुधवारी (ता.५) दुपारी मात्र प्रचंड मेघगर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला.  

फळे, पिकांचे नुकसान

जेवळी येथे बस स्थानक परिसरात भर वस्तीत झाडाखाली बांधण्यात आलेली भास्कर दुधभाते यांचे खोंड, जेवळी पूर्व तांडा येथील बाबू जाधव यांची शेतात झाडाखाली बांधलेली मुरा जातीची म्हैस, तर भोसगा येथील लक्ष्मण जळकोटे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून ठार झाली आहे, अशी माहिती जेवळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. हणमंत जगताप यांनी दिली. या वेळी पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात मेघगर्जना झाली. या पावसाने परिसरात फळपिकांचे नुकसान झाले. गावातील रस्त्यावरून काही प्रमाणात पाणी वाहिले.
 


इतर बातम्या
औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...