agriculture news in marathi, stormy rain occurs in next week, pune, maharashtra | Page 3 ||| Agrowon

पुढील आठवडा वादळी पावसाचा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सध्याच्या काळात सोयाबीन, उडीद, मूग पिकाची काढणी पूर्ण करावी. येत्या सोमवार, मंगळवारी कोकणपट्टी आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. सध्याच्या काळातील पाऊस हा भात, ऊस, कापूस, भुईमूग, मका, चारा पिके तसेच फळबागांसाठी उपयुक्त ठरला आहे. ज्या जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा झालेला आहे, तेथे रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, जवस या पिकांची पेरणी सुरू करावी; परंतु हलक्या जमिनी आणि अद्यापही कमी प्रमाणात असलेला पाऊस लक्षात घेता जमिनीचा पुरेसा ओलावा झाल्याशिवाय रब्बी पिकांच्या पेरणीची घाई करू नये. पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन करावे.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

पुणे  : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोसळला. राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. यातच राज्यात मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला असताना उद्यापासून (ता. ४) पावसाला पोषक हवामान होत आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विविध भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.   

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की मॉन्सूनने अद्याप परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. महाराष्ट्रातूनही साधारणत: १५ तारखेनंतरच मॉन्सून माघारी फिरण्यास सुरवात होईल. दरम्यानच्या काळात ४ ते ८ या कालावधीमध्ये राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणाच्या दक्षिण भागात चांगला पाऊस अपेक्षित असून, उर्वरित महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. तसेच काही ठिकाणी कमी काळात जोरदार पावसाच्या सरी येतील. तसेच १५ तारखेपर्यंतदेखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार असला तरी आठवडाभर (२२ ऑक्टोबरपर्यंत) पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. 

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, की ६ आॅक्टोबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने सोमवारपासून (ता. ७) ते शनिवारपर्यंत (ता. १२) महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. यातही बुधवारी (ता. ९) आणि गुरुवारी (ता. १०) पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. 
दरम्यान राज्यात भात, मका, सोयाबीन, कापसासह खरिपाची पिके परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. राज्यातील वादळी पावसाची शक्यता विचारात घेता, मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने काढणीस आलेल्या, साठवून ठेवलेल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...