agriculture news in marathi, stormy rain prediction in state continues | Agrowon

वादळी पावसाचा इशारा कायम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जोर धरला आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. आज (ता. २१) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना विजांसही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जोर धरला आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. आज (ता. २१) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना विजांसही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठत्ताड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. पावसाचा जोर मंगळवारपर्यंत (ता. २२) कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

दोन दिवस राज्याच्या विविध भागांत संततधार पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शनही झालेले नाही. गेल्या काही दिवसांत तशीपार गेलेल्या तापमानात मोठी घट झाली आहे. कोकणाच्या तापमानात सरासरीपेक्षा १ ते ७ अंश, मध्य महाराष्ट्रात २ ते १० अंश, मराठवाड्यात ३ ते ७ अंशांची, तर १ ते ६ अंशांची घसरण झाली आहे. रविवारी (ता. २०) मराठवाड्यातील नांदेड येथे सर्वाधिक ३३ अशंसेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पूर्व विदर्भात तापमान ३० अंशांपेक्षा अधिक आहे.

रविवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २४.६ (-७.१), जळगाव २८.०(-६.८), कोल्हापूर २७.८(-३.६), महाबळेश्वर २०.०(-५.९), मालेगाव २४.० (-९.४), नाशिक २५.४ (-६.९), सातारा २३.१ (-७.६), सोलापूर ३०.० (-२.७), अलिबाग २६.७ (-५.७), डहाणू २८.७ (-४.०), सांताक्रूझ २६.४ (-६.४), रत्नागिरी ३२.१(-०.३), औरंगाबाद २५.६ (-६.३), परभणी २६.३ (-३.२), नांदेड ३३.० (०.२), अकोला २८.६ (-४.९), अमरावती २७.८ (-५.८), बुलडाणा २५.० (-५.४), चंद्रपूर ३१.४(०.२), गोंदिया ३१.०(-१.३), नागपूर ३०.४ (-२.३), वर्धा २९.८ (-२.८), यवतमाळ २९.५(-२.२).

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...