agriculture news in marathi, stormy rain prediction in Vidarbha | Agrowon

विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे : राज्यातील उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. आज (ता. २१) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उद्यापासून (ता. २२) विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

पुणे : राज्यातील उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. आज (ता. २१) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उद्यापासून (ता. २२) विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. तर दोन दिवसांपूर्वी बहुतांशी ठिकाणी ३५ अंशांच्या खाली आलेले तापमान ३८ अंशांच्या वर गले आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती शनिवारी दुपारी निवळून गेली होती. विदर्भात आज (ता. २१) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याबरोबरच कमाल तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.२ (०.४), जळगाव ३९.८ (-२.०), कोल्हापूर ३७.२ (०.२), महाबळेश्वर ३१.७ (-०.२), मालेगाव ३९.२ (-०.९), नाशिक ३७.३ (-०.६), सांगली ३८.४ (-०.२), सातारा ३७.४ (०.६), सोलापूर ४०.६ (०.९), अलिबाग ३१.८ (०.०), डहाणू ३३.५ (०.७), सांताक्रूझ ३४.८ (२.०), रत्नागिरी ३३.० (०.९), औरंगाबाद ३७.० (-१.८), परभणी ४१.२ (०.२), अकोला ४०.३ (-०.८), अमरावती ३९.२ (-२.२), बुलडाणा ३९.० (१.४), बह्मपुरी ४२.६, चंद्रपूर ४१.० (-०.७), गोंदिया ३८.२ (-२.२), नागपूर ३९.२ (-१.४), वाशिम ३७.२, वर्धा ४०.३ (-१.३), यवतमाळ ३९.० (-१.७).

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...