विदर्भात वादळी पावसाची शक्यता; चटकाही वाढणार

विदर्भात वादळी पावसाची शक्यता; चटकाही वाढणार
विदर्भात वादळी पावसाची शक्यता; चटकाही वाढणार

पुणे  : राज्याच्या विविध भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. आज (ता. १९) पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून, उन्हाचा चटका असह्य होत आहे. उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  उन्हाचा ताप चांगलाच वाढला असून, बुधवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूरसह पुणे, धुळे, जळगाव, मालेगाव, सांताक्रूझ, परभणी, अकोला येथे तापमान ३७ अंशावर तर सांगली, सातारा, अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. रात्रीच्या किमान तापमानात घट झाल्याने पहाटे असलेली थंडी कमी होऊन उकाडा वाढू लागला आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १७ ते २६ अंशांदरम्यान आहे. निफाड येथे नीचांक १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.    बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरून बाष्प पुरवठा होत आहे. यातच मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता.१९) पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता असून, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१(१८.१), धुळे ३७.६ (१७.८), जळगाव ३७.६(२०.६), कोल्हापूर ३५.८(२३.७), महाबळेश्‍वर ३०.७(१९.५), मालेगाव ३७.६ (२१.२), नाशिक ३५.८(१७.८), निफाड ३३.०(१४.८), सांगली ३६.६(२३.१), सातारा ३६.९(२१.५), सोलापूर ३८.३(२६.२), अलिबाग ३३.० (२१.५), डहाणू ३१.९ (२१.५), सांताक्रूझ ३७.०(२१.०), रत्नागिरी ३५.३(२३.०), औरंगाबाद ३५.३(२१.७), परभणी ३७.७(२१.०), नांदेड ३५.५, अकोला ३७.७ (२०.६), अमरावती ३६.२ (१९.०), बुलडाणा ३५.६ (२१.५), चंद्रपूर ३६.० (१९.२), गोंदिया ३१.२ (१८.८), नागपूर ३५.८(१९.३), वर्धा ३६.४ (१९.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com