Agriculture news in marathi Stormy rain in the Shivana area | Agrowon

औरंगाबाद : शिवना परिसरात वादळी पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

शिवना, जि. औरंगाबाद : शिवना (ता. सिल्लोड)सह परिसरात येथे मंगळवारी (ता. १७ ) मध्यरात्री व बुधवारी (ता. १८) पहाटे वादळी पाऊस झाला. त्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील गहू, मका व हरभरा आदी पिके भुईसपाट झाली.

आमसरी, वाघेरा, नाटवी, वडाळी, टाका, मादनी, खुपटा, जळकीबाजार आदी गावांसह उत्तरेकडील डोंगरपट्टयाच्या टापूत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथे (गट क्रमांक ४०३) मधे विजय काळे, श्यामराव काटे आदी शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली. रब्बी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले. 

गत पावसाळ्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीतील पाणीपातळी वाढली आहे. विहिरी व प्रकल्प तुडुंब भरले. नदी,नाले ओसंडून वाहिल्याने मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे रब्बीत शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, मका या पिकांसह भाजीपाल्याची लागवड केली. खरिपाची तूट रब्बीत भरून निघेल, या आशेवर शेतकऱ्यांनी ही पिके जगविली. 

नुकसान भरपाईची मागणी

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटेच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...