Agriculture news in marathi Stormy winds hit Osmanabad city again | Agrowon

उस्मानाबाद शहराला पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

उस्मानाबाद : तीन दिवसांच्या खंडानंतर उस्मानाबाद शहराला रविवारी (ता. १९) पहाटे पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. नेहमीप्रमाणे वादळी वाऱ्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे पाऊणतास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. तर तालुक्यातील पळसप येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

उस्मानाबाद : तीन दिवसांच्या खंडानंतर उस्मानाबाद शहराला रविवारी (ता. १९) पहाटे पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. नेहमीप्रमाणे वादळी वाऱ्यानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे पाऊणतास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. तर तालुक्यातील पळसप येथे वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शहरात बुधवारी (ता. १५) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. विजेचा कडकडाट तेवढाच होता. त्यानंतर रविवारी (ता. १९) पहाटे पुन्हा एकदा तशाच वादळी वाऱ्याने शहराला तडाखा दिला. पहाटे दीडच्या सुमारास शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शहरातील झाडे हेलकावे खात होती. अगदी दहा मिनिटांतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यात पुन्हा विजेचा कडकडाट सुरू झाला. साखर झोपेत असलेल्या शहरवासीयांना ढगांच्या गडगडाटाने जाग केले. त्यात वीज गायब झाली तर सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. 

पळसपला पत्रे उडाली 
तालुक्यातील पळसप येथे पहाटे झालेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. रात्रीच्या वेळेला असा प्रकार झाल्याने नागरिकांना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागले. प्रशासन स्तरावर त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तू, धान्य पावसात भिजले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

झाड उन्मळून पडल्याने ४ शेळ्यांचा मृत्यू 
तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथे गारपिट, वादळी वाऱ्यासह शनिवारी (ता. १८) सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून वीजताराही तुटल्या. झाड उन्मळून पडल्याने त्याखाली अडकून चार शेळ्यांचा मृत्यू झाला. सहा शेळ्यांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, तालुक्यातील तामलवाडी, माळुंब्रा भागातही सायंकाळच्या सुमारास काही मिनिटे अवकाळी पाऊस झाला. 

शेळ्या पुढे होत्या, मी पाठीमागे होतो, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने झाड पडले. माझ्या चार शेळ्यांचा मृत्यू झाला. सहा शेळ्या शेजारील काही शेतकऱ्यांनी वाचविल्या. 
- बावालाल शेख, बिजनवाडी. 

पशुपालक बावालाल शेख याच्या शेळ्या मृत झाल्याबाबत पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 
- सौदागर तांदळे, तहसीलदार, तुळजापूर


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...