Agriculture news in marathi Stormy winds, rain overwhelmed the farmers in Nanded and Parbhani | Agrowon

नांदेड, परभणीत वादळी वारे, पावसाने शेतकरी धास्तावले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे, अवकाळी पावसामुळे शेतीपिके तसेच फळपिकांचे नुकसान झाले.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे, अवकाळी पावसामुळे शेतीपिके तसेच फळपिकांचे नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यातील १४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, मानवत, पालम तालुक्यातील ८ मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत तालुक्यातील ७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्याने रब्बी सुगी तसेच हळद काढणीच्या कामे खोळंबत आहेत. वाऱ्यामुळे फळगळ होऊन मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

मंळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ःनांदेड जिल्हा ः देगलूर ११, खानापूर २, शहापूर १६, मुखेड २, येवती २ मुक्रमाबाद २, कंधार ३, उस्माननगर ७, बारुळ २, पेठवडज २, फुलवळ १०, लोहा ९, कलंबर १२, सोनखेड ५. परभणी जिल्हा ः पालम १, पूर्णा ३, ताडकळस ५, लिमला २१, चुडावा २, गंगाखेड १४, माखणी २, कोल्हा ६. हिंगोली जिल्हा ः गोरेगाव ०.२५, पानकनेरगाव ३.२५, हत्ता ०.२५, वसमत ०.५०, नांदापूर १, आखाडा बाळापूर ०.२५, वारंगा ०.२५.


इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...