agriculture news in marathi, Story of Rose farmers form Yelse, Vadgaon Maval, Pune, Valentine day special | Agrowon

खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब उत्पादकांची यशोगाथा... व्हॅलेंटाइन डे स्पेशल (video सुद्धा)
संदीप नवले
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार आहे. येथील हवामान फूलशेतीसाठीही अत्यंत पोषक आहे. हा तालुका पॉलिहाउस व विशेषतः गुलाबशेतीचे हब म्हणून काही वर्षांपासून पुढे आला आहे. तालुक्यातील येळसे (पवनानगर) गावाने यात आघाडी घेतली. आजमितीला सुमारे १६ एकरांपर्यंत त्याचा पसारा वाढला आहे. येथील पॉलिहाउसमधील गुलाब व्हॅलेंटाइन डे व अन्य सणासुदीत परराज्यांबरोबर परदेशातही निर्यात होऊ लागला आहे. त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. 

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार आहे. येथील हवामान फूलशेतीसाठीही अत्यंत पोषक आहे. हा तालुका पॉलिहाउस व विशेषतः गुलाबशेतीचे हब म्हणून काही वर्षांपासून पुढे आला आहे. तालुक्यातील येळसे (पवनानगर) गावाने यात आघाडी घेतली. आजमितीला सुमारे १६ एकरांपर्यंत त्याचा पसारा वाढला आहे. येथील पॉलिहाउसमधील गुलाब व्हॅलेंटाइन डे व अन्य सणासुदीत परराज्यांबरोबर परदेशातही निर्यात होऊ लागला आहे. त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. 

 शैक्षणिक, सांस्कृतिक अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख केवळ राज्यापुरती नसून ती देशात निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्याचा मुख्य भाग असलेल्या वडगाव मावळमधील पॉलिहाउसमधील गुलाबशेती त्याला मुख्य कारणीभूत आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक कंपन्याही या व्यवसायात आहेत. व्हॅलेटाइन डे, दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, लग्नसराई आदी कालावधीत या भागात फुलणाऱ्या गुलाबाला मोठी मागणी असते. 

गुलाब उत्पादनात येळसेच्या शेतकऱ्यांचा हातखंडा.. Video पहा...

येळसे गावाची शेती 
पवना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या येळसे गावाची लोकसंख्या अवघी एक ते दीड हजार एवढी आहे. येथील अनेक शेतकरी पावसाळ्यात भात तर रब्बीत हरभरा, ज्वारी, गहू अशी पिके घेतात. उन्हाळ्यात शेत खाली ठेवून पुन्हा भातासाठी शेत तयार करतात. मागील काही वर्षापासून मात्र पॉलिहाउसमध्ये फूललशेती, ढोबळी मिरची, काकडी अशा पिकांकडे तो वळला आहे. 
मावळ तालुका तसा अती पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. पावसाची सरासरी तीन हजार मिलिमीटर एवढी आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चारही महिने या भागात पाणी उपलब्ध असते. 
साहजिकच भाताशिवाय अन्य पीक घेणे जिकिरीचे ठरते. घ्यावयाचे ठरल्यास शेडनेट हाउस किंवा पॉलिहाउसचा आधार घ्यावा लागतो. 

नर्सरीचे गाव 
येळसेत २००५ पूर्वी मोठ्या प्रमाणात ‘नर्सरी’चा व्यवसाय अनेक शेतकरी करायचे. त्यामुळे नर्सरीचे गाव म्हणून ते ओळखले जायचे. मात्र अतिपावसामुळे रोपे खराब होऊन मोठा तोटा सहन करावा लागत असे. याला पर्याय म्हणून अन्य व्यवसाय सुरू करता येईल का याचा विचार शेतकरी करत होते. गावातील उमदा युवा शेतकरी मुकुंद ठाकर यांना तळेगाव दाभाडे येथे असलेल्या पॉलिहाउसच्या हबची बऱ्यापैकी माहिती होती. त्यांनी येथील गुलाब शेतीतील अधिक माहिती घेतली. मग नर्सरीऐवजी गुलाब शेती करण्याचा निर्णय घेतला. अभ्यास व प्रयत्नांतून त्यात चांगले बस्तानही बसवले. मग अन्य शेतकरीही अभ्यासातून त्याकडे वळू लागले. 

पवना फूलउत्पादक संघाची स्थापना 
हळूहळू गुलाब उत्पादकांची संख्या वाढू लागली. केवळ एकेकट्याने शेती व विक्री करण्यापेक्षा समूहाने एकत्र आल्यास अनेक समस्या कमी होतील, दोन पैसे अधिक मिळतील हा विचार ठाकर यांनी केला. त्यातून पवना फूल उत्पादक संघाची २०१३ मध्ये स्थापना झाली. मग टप्प्याटप्प्याने पॉलिहाउसची उभारणीसाठी कर्ज, लागवड ते विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन या बाबींना चालना मिळाली. 
एकत्र आल्याने दर्जेदार फुलांचे उत्पादन घेऊन परराज्यात व अन्य देशांत निर्यात करणे 
शक्य झाले. 

येळसे गाव- गुलाब शेतीची वैशिष्ट्ये 

 • गावचे एकूण शेतीक्षेत्र- ५५० हेक्टर 
 • खरिपात भात, अन्य पिकांत ऊस, टोमॅटो, काकडी, फरसबी, वांगे, गहू 
 • गावात सुमारे १७ एकरांवर पॉलिहाउसेस. त्यात गुलाब, जरबेरा अशी विविध फूलपिके 
 • पाच ते सहा शेतकरी नर्सरीचा व्यवसाय करतात. यात गुलाबाच्या रोपांचाही समावेश. वर्षाकाठी जवळपास ५० लाख रुपयांपर्यंत उलाढालीचा अंदाज 
 • ठिबकने पाणी पुरवठा केला जातो. यामुळे दुष्काळातही गुलाबाचे चांगले उत्पादन घेता आले. 
 • निविष्ठांची एकाच वेळी खरेदी केली जाते. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. 
 • फुलांचे ग्रेडिंग, पॅकिंग ग्रेडनुसार होते. निर्यातीसाठी १२ फुलांचा तर स्थानिकसाठी २० फुलांचा बंच 

व्हॅलेंटाइन डेसाठी गाव सज्ज 
‘व्हॅलेंटाइन डे’ दिवसासाठी निर्यात करण्यासाठी काही महिने आधीच शेतकरी तयारी सुरू करतात. असते. धारणपणे २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात गुलाबांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. सध्या गावातील शेतकऱ्यांकडे एकूण आठ ‘कोल्ड स्टोरेजेस’ आहेत. त्यात एकूण दहा ते बारा लाख फुले ठेवण्याची क्षमता आहे. दर कमी असल्यास दोन ते तीन दिवसापर्यंत फुले त्यात ठेवली जातात. 

व्हॅलेंटाइन डेसाठी विक्री 

 • दिल्ली, सूरत, अहमदाबाद, बडोदा, गुवाहाटी, राजकोट, जम्मू, हैदराबाद, पटना, पुणे, मुंबई 
 • निर्यात- हॉलंड, जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका 
 • निर्यात दर- प्रतिफूल सरासरी १३-१४ रु., स्थानिक- सरासरी ८-९ रु. 

अर्थकारण 
एक एकर पॉलिहाउससाठी सुमारे ६० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक राहते. त्यातील २५ टक्के हिस्सा स्वतःकडील व उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता येते. जमीन चढउताराची असेल तर ‘लेव्हल’ करण्याचा खर्च परिस्थितीनुसार दहा लाख रुपयांपर्यतही होऊ शकतो. ‘कोल्ड स्टोरेज’साठी चार टन क्षमतेच्या प्रति यंत्रणेमागे दहा लाख रुपयांची गुंतवणूक गरजेची असते. 
पू्र्वी इथला शेतकरी भात, भाजीपाला या पिकांद्वारे एकरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळवत असे. आता गुलाबशेतीतून वर्षाला दहा गुंठ्यातून त्याहून किमान दुप्पट व त्याहून अधिक उत्पन्न तो घेत आहे. सध्या गुलाब शेतीतून गावात जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होत असावी असा अंदाज आहे. गुलाब शेतीत खर्च प्रति फूल २.५० ते ३ रुपये येतो. एकूण विचार करता ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत नफा होऊ शकतो. 

विक्रीच्या नोंदी 
गावात गुलाबाचे क्षेत्र वाढले आहे. आता गावातील शेतकरी आपले गुलाब एकाच ठिकाणी आणून त्याचे ग्रेडींग, पॅकिंग करतात. एकाच ठिकाणाहून विक्री करण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत झाली आहे. कोणी ग्रेडिंग, पॅकिंगसाठी किती फुले पाठविली, किती विक्री झाली, कोणत्या व्यापाऱ्याकडून किती मागणी आहे, रोजचा एकूण खर्च, येणे बाकी, एकूण नफा आदी सर्व तपशील संगणकावर नोंदवला जातो. त्याचे सर्व कामकाज बारकाईने मुकुंद ठाकर पाहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत नाहीत. 

दीडशे मजुरांना रोजगार उपलब्ध 
गुलाबशेतीतून परिसरातील मजुरांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या या शेतीत 
गावात जवळपास १०० ते १५० मजूर कार्यरत आहेत. त्यासाठी मजुरांची काळजी घेतली जाते. कामातील व्यवस्था पाळताना घरी जाण्यास उशीर झाल्यास प्रसंगी महिला मजुरांना घरी पोचविण्याचेही काम केले जाते. त्यामुळे शेतकरी व मजूर असा दोघांमध्येही विश्वास तयार झाला आहे. 

कृषी अधिकाऱ्यांची मदत 
पॉलिहाउस, कोल्ड स्टोरेज अशा विविध योजनांसाठी माजी तालुका कृषी अधिकारी विनायक कोथंबिरे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, कृषी सहायक नवीनचंद्र बोऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल यांनी मदत केली आहे. त्याद्वारे गुलाब उत्पादकांना एकूण सुमारे दीड कोटी रुपयांपर्यतचे अनुदान उपलब्ध झाले आहे. अजून दीड कोटी रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 

बँकेत मिळवली पत 
ठाकर यांनी सिंडिकेट बँकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याची वेळेवर परतफेड केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अन्य शेतकऱ्यांनीही कर्जाची परतफेड करणे शक्य झाले. त्यामुळे बँकेकडे त्यांची चांगली पत तयार झाली आहे. एकीच्या बळावर येळसे गावाने गुलाबशेतीत आपले नाव तयार केले आहे. त्यामुळेच गावातील तरुण शेतकऱ्यांनी निर्यात करण्यापर्यंत मजल मारली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनाही त्याची प्रेरणा मिळू लागली आहे. 

तालुक्यातील उलाढाल 
मावळ तालुक्यात २५० हेक्टरहून अधिक पॉलिहाउसेस आहेत. यात मुख्यतः गुलाबाची शेती केली जाते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त तालुक्यातून २५ जानेवारी ते १४ फेब्रवारी या काळात जवळपास दहा कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. यंदाही फुलांना चांगली मागणी असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता असे ठाकर यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 
सन २०१४ मध्ये पॉलिहाउसची उभारणी केली. सध्या २५ गुंठ्यात गुलाबशेतीतून वार्षिक चांगल्या नफ्याने उत्पन्न घेत आहे. 
-विश्वनाथ गंगाराम जाधव 
संपर्क- ९४२२३२८७८७ 

भातातून कमी उत्पन्न मिळायचे. सध्या चार एकरांवरील पॉलिहाउसमध्ये विविध फुलांचे उत्पादन घेत आहे. 
-तानाजी दामू शेंडगे 
संपर्क- ९८९०१९५०३५ 

माझी साडेचार एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरावर पिवळ्या, लाल रंगाच्या गुलाबाचे उत्पादन घेतो. 
-ज्ञानेश्वर ठाकर 

गुलाबशेतीसाठी २००६ मध्ये मी पुढाकार घेतला. आज गावातील गुलाबशेती विस्तारली आहे. अजून १६-१७ एकरांवर ही शेती वाढण्याची शक्यता आहे. गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात होते. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. 
-मुकुंद ठाकर 
संपर्क- ९८२३४४०८०३ 

गुलाब उत्पादकांचे उपक्रम 

 • नव्या शेतकऱ्यांना गुलाबशेतीचे मार्गदर्शन 
 • कर्जासाठी बँकांकडून कार्यशाळांचे आयोजन 
 • वृक्षारोपण 
 • प्राथमिक शाळेला संगणकाची मदत 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...