Agriculture news in marathi Strategy for sustainable aquaculture, the world's fastest growing food sector | Agrowon

मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण आखण्याची गरज

वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून, लोकांची जीवनशैलीही वेगाने सुधारत आहे. या दोन्ही कारणामुळे सागरी खाद्यावरील अवलंबित्व वाढत चालले आहे.
 

जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून, लोकांची जीवनशैलीही वेगाने सुधारत आहे. या दोन्ही कारणामुळे सागरी खाद्यावरील अवलंबित्व वाढत चालले आहे.

जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून, लोकांची जीवनशैलीही वेगाने सुधारत आहे. या दोन्ही कारणामुळे सागरी खाद्यावरील अवलंबित्व वाढत चालले आहे. अशा वेळी सागरी मासेमारी, सागरी मत्स्यपालन या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार करणारे धोरण आखण्याची गरज निर्माण होत आहे. या क्षेत्रातील गुंतागुंत जाणून त्याचा विस्तृत असा अहवाल तयार करण्याचे काम भविष्यातील शाश्वत मत्स्यपालन केंद्राच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठ - सॅण्टा बार्बरा येथील साहाय्यक प्रो. हॅले इ. फ्रोईहलिच यांनी सागरी मत्स्यपालन या उद्योगाचे मानव, पर्यावरण आणि प्राण्यांच्या आरोग्य या निकषांवर तयार होणाऱ्या गुंतागुंतीचा अभ्यास व विश्लेषण केले आहे. अशा प्रकारे एखाद्या उद्योगाचा एकात्मिक पद्धतीने विचार करण्याला ‘वन हेल्थ फ्रेमवर्क’ असे म्हटले जाते. या अभ्यासासाठी भविष्यातील शाश्वत मत्स्यपालन केंद्राच्या नेतृत्वाखाली विविध शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ, धोरण कर्ते यांचा समावेश होता. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर फूड’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

माणसी सरासरी २० किलो सागरी खाद्याचा प्रती वर्ष वापर होत आहे. २०२० मध्ये सागरी खाद्यांचा आहारातील आजवरचा सर्वाधिक वापर झाला आहे. आतापर्यंत गोड्या पाण्यातील आणि समुद्रातून पकडलेल्या सागरी घटकांचा वापर आहारामध्ये होत असे. मात्र, अलिकडे खाद्यासाठी सागरी मत्स्यपालन करण्याचे प्रमाण वेग पकडत आहे. या क्षेत्रातून होणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण २०५० सालापर्यंत दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सागरी मत्स्यपालनाविषयी अधिक माहिती देताना प्रो. फ्रोईहलिच यांनी सांगितले, की जागतिक खाद्य संस्कृतीचा विचार करता मत्स्यपालन हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे. भविष्यामध्ये जमिनीचे प्रमाण मर्यादित असताना सागरावरील अवलंबित्व वाढत जाणार आहे. मात्र, ते अधिक शाश्वत पद्धतीने कशा प्रकारे राबवले जाईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.

  • गरीब आणि विकसनशील देशातील लक्षावधी लोकांच्या आहारातील पोषक घटकांच्या पूर्ततेसाठी मत्स्यपालन महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मात्र, मासेमारी करतेवेळी पर्यावरणावर होणारे परिणाम, मत्स्यपालनातील प्रतिजैविकांचा वापर, रोगकारक घटकांचा होणारा प्रसार, वाढत्या प्रमाणातील मत्स्यखाद्याची व मत्स्यतेलाची आवश्यकता याकडेही लक्ष द्यावे लागेल.
  • थंड रक्ताच्या प्राण्यांचे पालन हे पोषकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः कोळंबीसारख्या प्राण्यांना खाद्य देण्याचीही आवश्यकता भासत नाही.
  • अन्य कोणत्याही उद्योगापेक्षा फारच कमी कार्बन फूटप्रिंट मत्स्यउद्योगातून निर्माण होतात.
  • मत्स्य उद्योगाची शाश्वतता जपतानाच विस्ताराचे धोरण राष्ट्रीय पातळीवर राबवताना या संशोधनाची मदत होणार आहे.

सामाजिक पातळीवर उद्योगाचा विचार

  • मत्स्यपालनाव्यतिरीक्त अन्य माशांच्या विविधता, पर्यावरण आणि आरोग्यांचाही विचार अत्यावश्यक आहे.
  • मत्स्य उद्योगामध्ये कार्यरत मजुरांच्या समस्या, त्यांच्यातील लैंगिक असमानतेची वागणूक या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत.
  • संपर्क, सहकार आणि समन्वय या तीन बाबी शाश्वत विकासासाठी गरजेच्या आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत व्यक्ती, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांच्यामध्ये समन्वय नसल्यास कोणत्याही उद्योगाची वाढ होऊ शकत नाही.मत्स्यउद्योगासाठी अशा प्रकारचे समन्वय साधणारी संरचना विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे मत फ्रोईहलिच यांनी व्यक्त केले.
  • या संशोधन अहवालातील काही तत्त्वाचा वापर युरोपीय संघ आणि नॉर्वे शासनाने सुरू केला आहे. सध्या अमेरिकेतील विशेषतः कॅलिफोर्निया येथील मत्स्य उद्योगांवर लक्ष पुरवण्यात येत असल्याचे प्रो. फ्रोईहलिच यांनी सांगितले. या राज्यामध्ये मत्स्यपालन व्यवसायावर मोठा भर असून, अन्य किनारपट्टीवरील राज्यांमध्ये प्रामुख्याने मासेमारी या एकाच उद्देशाने या व्यवसायाकडे पाहिले जाते. या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्यक्षातील वर्तन, धोरण आणि त्यांच्या अंतर्गत ताणेबाणे यावर आधारीत एक मत्स्यपालन धोरण आखण्यासंदर्भात त्या काम करत आहे. सध्या त्यांना सागरी मत्स्यपालनासंदर्भात एकत्रित माहिती साठा गोळा करण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे.

 


इतर अॅग्रोमनी
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...