agriculture news in Marathi strawberry from chikhaldara wants political support Maharashtra | Agrowon

चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय राजाश्रय

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी सर्वच तांत्रिक साह्य केले जाते. पर्यटकांच्या संख्येमुळे तूर्त मार्केटिंगची समस्या नाही. या वर्षीपासून ४० टक्के अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- प्रा. शशांक देशमुख, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.

अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्ट्रॉबेरीला महाराष्ट्रात महाबळेश्‍वरनंतर विदर्भाच्या नंदनवनातील चिखलदऱ्याचे वातावरण पोषक ठरले. सलग पाच वर्षांच्या प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली. मात्र, चिखलदऱ्यातील स्ट्रॉबेरी शेतीला राजाश्रय मिळाला नाही, तर या फळपिकाची स्थिती कॉफीमळ्यासारखीच होण्याची शक्‍यता आहे.

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि श्री शिवाजी उद्यानविद्या विभागाच्या सहकार्याने थंड हवेच्या ठिकाण असलेल्या चिखलदरा तालुक्‍यात २०१५ मध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिला प्रयोग केला. स्ट्रॉबेरीच्या ‘विंटरडॉन’ या वाणाला चिखलदऱ्याचे थंड वातावरण व माती पोषक ठरली. प्रयोगाच्या यशस्वितेनंतर ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली.

आंबूस-गोड चवीची ही रसाळ स्ट्रॉबेरी पर्यटकांच्या पसंतीला उतरली. प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दर मिळू लागला. पर्यटकांसोबत ती विदर्भात जेमतेम पोचू लागली. मात्र या वर्षी केवळ तीन-चार शेतकऱ्यांनीच अवघ्या साडेतीन एकरांत स्ट्राबेरीची लागवड केली. चिखलदरा परिसरात यापूर्वी शेतकऱ्यांच्या श्रमाने बहरलेल्या कॉफीमळ्यांवर राजाश्रयाअभावी अवकळा आली. तीच अवस्था स्ट्रॉबेरीची होते की काय, अशी शंका आहे.

स्ट्रॉबेरी शेतीचे अर्थकारण
स्ट्रॉबेरीच्या एका झाडाला सर्वसाधारणपणे ५०० ते ७५० ग्रॅम फळे लागतात. सात ते दहा रुपये प्रतिरोपांप्रमाणे एक एकरातील रोपांची संख्या सुमारे २० हजारांच्या घरात असते. वाहतूक आणि मशागत, लागवड असा प्रतिएकरी एकूण दोन-सव्वादोन लाखांचा खर्च येतो. याउलट एकरी किमान साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
स्ट्रॉबेरी पिकातून पाच वर्षांत आत्तापर्यंत हमखास उत्पन्न मिळाले. जास्त उत्पादन झाल्यास साठवणुकीची सोय नाही. रोप खरेदीवर एका वेळी मोठा खर्च होत असल्याने व शासनाकडून आर्थिक स्वरूपात मदत नसल्याने शेतकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी धजावत नाही.
- गजानन शनवारे, स्ट्रॉबेरी उत्पादक, रा. मोथा.

 

 


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...