agriculture news in Marathi strawberry farming in chinchwadgaon Maharashtra | Agrowon

बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये स्ट्रॉबेरीची शेती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

परभणी, परळी, माजलगाव, वडवणी येथील व्यापाऱ्यांना व थेट ग्राहकांनाही ताजी स्ट्रॉबेरी विक्री करतो आहोत. आता दिवसाआड दहा ते बारा किलो उत्पादन होते आहे. 
- रामप्रसाद घुगे, शेतकरी, चिंचवडगाव, ता. वडवणी. 

बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे उत्पादन आता ४४ डिग्री तापमान असलेल्या बीड जिल्ह्यातही घेण्याचा प्रयत्न शेतकरी करताहेत. वडवणी तालुक्‍यातील चिंचवडगाव येथील शिक्षणशास्त्रातील पदविका घेतलेले शेतकरी रामप्रसाद विक्रम घुगे यांनी ५०० रोपांपासून सुरू केलेली स्ट्रॉबेरी शेती मिळालेल्या यशामुळे पुढील वर्षी गट शेतीच्या माध्यमातून विस्तारणार असल्याचे सांगितले.  

शिक्षणशास्त्रातील पदविका घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीची आवड असल्याने शेतीतच करिअर करण्याचा निश्‍चय वडवणी तालुक्‍यातील चिंचवडगाव येथील रामप्रसाद विक्रम घुगे यांनी केला. कुटुंबाकडील १५ एकर शेतीत भाजीपाला पिकविण्याकडे लक्ष केंद्रित केले. यात प्रामुख्याने शिमला मिरचीचे उत्पादन घेत चांगला नफा त्यांनी कमविला. तसेच गोविंद तिडके, इमाम शेख, ज्ञानेश्वर गवारे, महादेव पुरी, आनंत घोलप, संतोष पडुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेत नव्याने गॅलोन वांग्याची प्रत्येकी एक एकरमध्ये लागवड केली. या वांग्यापासून गिरवीची निर्मिती होत असल्याने वांग्याना चांगला भाव मिळत आहे. दोन एकर वर सीताफळ लागवडीची तयारी केली आहे.

वळले स्ट्रॉबेरीकडे...
महाबळेश्वरच्या थंड वातावरणात स्टॉबेरीचेे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. स्ट्रोबेरी नगावर विकली जात असल्याने नफा मोठ्या प्रमाणात मिळतो. आपल्याकडे ४४ डिग्री तापमाणात हे पीक घेता येईल का, याकरिता रामप्रसाद घुगे यांनी २०१६ मध्ये स्ट्रॉबेरीच्या ५ रोपट्यांची लागवड केली. ते यशस्वी झाल्याने २०१७ साली १०० रोपांची लागवड केली. ते पीकही यशस्वी झाल्याने यंदा महाबळेश्वर येथील एजन्सीला ऑर्डर देत कॅलिफोर्निया येथून ५०० मदर प्लान्टची मागणी करत एक गुंठा शेतीमध्ये लागवड केली. या मदर प्लांटचे एक रोपाची किंमत ५० ते ६० रुपये होती. या मदर प्लान्टला आता फळं लागणे सुरू असून, इतर भाजीपाल्याबरोबर त्या फळांची परभणी, परळी, माजलगाव आणि थेट ग्राहकांना विक्री येथील बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती रामप्रसाद घुगे यांनी दिली. 

गटशेतीतून होणार लागवड
पुढील वर्षी गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेत किमान दोन एकरांवर हे पीक घेण्याचा निश्‍चय घुगे यांनी व्यक्त केला. भाजीपाला शेतीनंतर फळबाग शेती यशस्वी करण्याकरिता तालुका कृषी अधिकारी श्री शरद शिनगारे व कृषी सहायक गणेश बडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे रामप्रसाद घुगे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
शेतकरी रामप्रसाद घुगे यांच्या शेतात घेतलेल्या स्ट्रॉबेरीची चव चांगली आहे. यशस्विता व बाजारपेठेचा विचार करून अशा प्रकारच्या  नावीण्यपूर्ण पिकाचा प्रयोग म्हणून थोड्या क्षेत्रावर करायला हरकत नाही. 
- शरद शिनगारे, तालुका कृषी अधिकारी वडवणी. 

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...