agriculture news in marathi, strawberry festival starts, satara, maharashtra | Agrowon

स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा : डॉ. सरकाळे
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा येथील तांबड्या मातीचे प्रतिबिंब आहे. सध्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर देत ‘रेसिड्यू फ्री'' पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा येथील तांबड्या मातीचे प्रतिबिंब आहे. सध्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर देत ‘रेसिड्यू फ्री'' पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथे शुक्रवारी स्ट्रॉबेरी ग्रोव्हसर्स असोसिएशन, श्रीराम फळ प्रक्रिया संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सव २०१९’च्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. सरकाळे बोलत होते. या वेळी प्रगतशील शेतकरी बाबुराव गनू भिलारे, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपूरे, आनंदा भिलारे, संतोष रांजणे, राजेंद्र भिलारे, शरद चौधरी, जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक आर. एम. भिलारे, उपसरपंच अनिल भिलारे, नितीन भिलारे, महेश रसाळ, शिवाजी भिलारे व स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी बाळासाहेब भिलारे म्हणाले, की भिलारच्या परंपरेला साजेसा असा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येत असून, स्ट्रॉबेरी या फळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांची आर्थिक उन्नती व्हावी हाच उद्देश या महोत्सवाचा आहे. यावेळी नितीन भिलारे यांनी स्वागत केले.  

स्ट्रॉबेरी अन्‌ मासे पकडण्याची मजा 
दरम्यान, किंगबेरी येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी कमान उभारली आहे. या ठिकाणी स्ट्रॉबेरी, जॅम, जेली, सिरप, मसाले, स्ट्रॉबेरी रोपे यांचे विविध स्टॉल्स उभारले आहेत. तसेच शेतातील स्ट्रॉबेरी, तळ्यातील मासे पकडण्याची मजा या ठिकाणी पर्यटक लुटताना दिसत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...