कोरोनामुळे अडकले स्ट्रॉबेरीचे मदरप्लँट 

या हंगामात कोरोनासह विविध कारणामुळे स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे पुढील हंगामाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कोरोनाचे संकट भीषण असल्याने मदरप्लँटचे काय होणार हे समजत नाही. जून अखेरीपर्यंत जरी मदरप्लँट आले तरी हंगाम मिळू शकतो. यासाठी सरकारने आवश्यक ती काळजी घेऊन मदरप्लँट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. - बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, अखिल भारतीय स्ट्रॅाबेरी उत्पादक संघ.
strawberry mother plant
strawberry mother plant

साताराः अमेरिका, स्पेन, इटलीत लॅाकडाऊन असल्याने या देशांतून येणारे स्ट्रॅाबेरीचे मदरप्लँट (मातृवृक्ष) वेळेत येणार येण्याबाबत शंका आहे. त्यामुळे महाबळेश्वरसह राज्यातील स्ट्रॅाबेरी उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मदरप्लँट निर्यात करणारे देश आणि भारत सरकारच्या धोरणावर स्ट्रॅाबेरी हंगामाचे भवितव्य ठरणार आहे.  राज्यात सर्वाधिक स्ट्रॅाबेरीचे पिक महाबळेश्वरात घेतले जाते. यानंतर जावळी, वाई, सातारा या तालुक्यासह कमी अधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरी केली जाते. मागील काही वर्षांपासून देशात काही ठिकाणी स्ट्रॅाबेरी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, पोषक वातावरण, नैसर्गिक साधन संपत्ती, थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरी सर्वाधिक मागणी असते.  स्ट्रॅाबेरी रोपे तयार करण्यासाठी परदेशातून मदरप्लँटची आयात केले जातात. या मदरप्लँटद्वारे रोपे तयार करून त्याची लागवड केली जाते. साधारपणे देशातून २० लाखापर्यंत मदरप्लँटची मागणी केली जाते. यामध्ये सर्वाधिक ७० टक्केवर म्हणजे १५ ते १६ लाख मागणी एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून केली जाते. मे व जून महिन्यातही हे प्लँट येतात. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्याची परिस्थिती बदलली आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशातून सर्वाधिक मदरप्लॅंट येत असतात. पंरतू सध्या येथे अनेक ठिकाणी लॅाकडाऊन करण्यात आल्यामुळे मदरप्लँट मिळतील की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. सद्य परिस्थितीत विमान वाहतूक पुर्णपणे बंद आहे. यामुळे मदरप्लँट येऊ शकणार नाहीत. मात्र सुदैवाने मे व जून महिन्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास प्लॅट बाबत आशा आहेत. मात्र यासाठी निर्यात करणारे देश तसेच आपल्या सरकार मदरप्लँटबाबत कसा निणर्य घेणार यावर स्ट्रॅाबेरीच्या हंगामाचे भवितव्य ठरणार आहे.  मदरप्लॅंटची वाहतूक विमानाने होत असते यासाठी विमान सेवा सुरळीत होणे गरजेचे आहेत. निर्यात करणाऱ्या देशात सध्या कोरोनाचे थैमान असल्याने येणार प्लॅंट सॅनिटायझर करून आणणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थती बघता मे महिन्यात मदरप्लँट येण्याच्या आशा कमी आहेत. मात्र जून महिन्यात जरी प्लँट आले तरी हंगाम शेतकऱ्यांना घेता येणे शक्य होणार आहे.  हंगामावर संकटाची मालिका  यंदाच्या स्ट्रॅाबेरी हंगामात पावसामुळे रोपाची मर, लागवड क्षेत्रात घट, वन्यप्राण्यांकडून नासधूस, कमी थंडी, वातावरणातील बदल याचा फटका बसला. आता लॅाकडाऊनमुळे सर्व ठिकाणी वाहतूक बंद आहे. तसेच पर्यटक आले नसल्यामुळे स्ट्रॅाबेरी तोडणी बंद करावी लागली आहे. यातून एकट्या महाबळेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य होणार नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com