agriculture news in marathi strawberry plantation area decrease satara maharashtra | Agrowon

कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे क्षेत्र, वाचा सविस्तर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अतिपावसाने स्ट्रॅाबेरीचे मोठे नुकसान झाले आहे. क्षेत्र घटल्याने उत्पादनात घट होणार आहे. मात्र, या वर्षी चांगले दर राहतील, असा अंदाज असल्याने शेतकरी स्ट्रॉबेरीची काटेकोर काळजी घेत आहेत. 
- किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्‍वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्था.

सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका स्ट्रॅाबेरी पिकालाही बसला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड झाली. मात्र, पावसामुळे सुमारे एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीची रोपे ‘मर’मुळे कुजून गेल्याने लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे. दिवाळीदरम्यान ग्राहकांना स्ट्रॉबेरी उपलब्ध न झाल्यामुळे चांगल्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे.

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरीचे पीक घेतले जाते. यानंतर जावळी, वाई, खटाव, सातारा, पाटण या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरी लागवड होते. या हंगामाची मे महिन्यापासून सुरूवात झाली होती. मे महिन्यात युरोपातून १६ ते १७ लाख मातृरोपे आयात करण्यात आले होती. हरितगृहात या मातृरोपांद्वारे लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली. या हंगामात स्ट्रॉबेरीची मातृरोपे वेळेत आल्याने लागवडीसाठीची रोपे वेळेत तयार झाली होती. 
सप्टेंबर माहिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता.

लागवडीच्या काळात महाबळेश्वरसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले. यामुळे काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. यानंतर पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली. महाबळेश्वर तालुक्यात २५०० एकर तर इतर तालुक्यांत एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली होती. स्ट्रॅाबेरीची लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणीची स्ट्रॅाबेरी पाण्याखाली गेली होती. या अतिपाण्यामुळे स्ट्रॅाबेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. सततच्या पावसामुळे शेतात पाणी निघत नव्हते.  

एकुण क्षैत्रापैकी एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॅाबेरी मर रोगाने गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, जवळपास २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भाग तसेच जावळी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अर्ली झालेल्या स्ट्रॅाबेरीची लागवड झाली असून सध्या या स्ट्रॅाबेरीचे उत्पादन सुरू झाले आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात स्ट्रॉबेरी प्रमुख बहर बाजारात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

दर चांगला मिळण्याची आशा 

स्ट्रॉबेरीची उशिरा झालेली लागवड आणि दिवाळीचा सण लवकर असल्याने यंदाच्या दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. दिवाळी सणादरम्यान पर्यटकांकडून मिळणाऱ्या चांगल्या म्हणजेच किलोला ४०० ते ५०० रुपये दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात झालेली घट व लागवड झालेल्या क्षेत्राचे पावसाने नुकसान झाल्याने या वर्षी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मिळणाऱ्या उत्पादनास चांगला दर मिळण्याची अशा शेतकऱ्यांना आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...