agriculture news in marathi strawberry plantation area decrease satara maharashtra | Page 2 ||| Agrowon

कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे क्षेत्र, वाचा सविस्तर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अतिपावसाने स्ट्रॅाबेरीचे मोठे नुकसान झाले आहे. क्षेत्र घटल्याने उत्पादनात घट होणार आहे. मात्र, या वर्षी चांगले दर राहतील, असा अंदाज असल्याने शेतकरी स्ट्रॉबेरीची काटेकोर काळजी घेत आहेत. 
- किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्‍वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्था.

सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका स्ट्रॅाबेरी पिकालाही बसला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड झाली. मात्र, पावसामुळे सुमारे एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीची रोपे ‘मर’मुळे कुजून गेल्याने लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे. दिवाळीदरम्यान ग्राहकांना स्ट्रॉबेरी उपलब्ध न झाल्यामुळे चांगल्या दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे.

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरीचे पीक घेतले जाते. यानंतर जावळी, वाई, खटाव, सातारा, पाटण या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरी लागवड होते. या हंगामाची मे महिन्यापासून सुरूवात झाली होती. मे महिन्यात युरोपातून १६ ते १७ लाख मातृरोपे आयात करण्यात आले होती. हरितगृहात या मातृरोपांद्वारे लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली. या हंगामात स्ट्रॉबेरीची मातृरोपे वेळेत आल्याने लागवडीसाठीची रोपे वेळेत तयार झाली होती. 
सप्टेंबर माहिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता.

लागवडीच्या काळात महाबळेश्वरसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले. यामुळे काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. यानंतर पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली. महाबळेश्वर तालुक्यात २५०० एकर तर इतर तालुक्यांत एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली होती. स्ट्रॅाबेरीची लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणीची स्ट्रॅाबेरी पाण्याखाली गेली होती. या अतिपाण्यामुळे स्ट्रॅाबेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. सततच्या पावसामुळे शेतात पाणी निघत नव्हते.  

एकुण क्षैत्रापैकी एक हजार एकर क्षेत्रावरील स्ट्रॅाबेरी मर रोगाने गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, जवळपास २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भाग तसेच जावळी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अर्ली झालेल्या स्ट्रॅाबेरीची लागवड झाली असून सध्या या स्ट्रॅाबेरीचे उत्पादन सुरू झाले आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात स्ट्रॉबेरी प्रमुख बहर बाजारात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

दर चांगला मिळण्याची आशा 

स्ट्रॉबेरीची उशिरा झालेली लागवड आणि दिवाळीचा सण लवकर असल्याने यंदाच्या दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. दिवाळी सणादरम्यान पर्यटकांकडून मिळणाऱ्या चांगल्या म्हणजेच किलोला ४०० ते ५०० रुपये दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात झालेली घट व लागवड झालेल्या क्षेत्राचे पावसाने नुकसान झाल्याने या वर्षी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मिळणाऱ्या उत्पादनास चांगला दर मिळण्याची अशा शेतकऱ्यांना आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा...सोलापूर ः अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका...
शेतकरी नियोजन (पीक : हरभरा)सध्या पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले...
उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड...भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक...
तापमानात वाढ होण्याची शक्यताकमाल तापमान विदर्भात ३.१ अंश सेल्सिअसने, तर कोकण...
सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी...सोलापूर : केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत...
बाळापुरात आढळले ४१ पक्षी मृतावस्थेतअकोला : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील नकाशी येथे...
सांगलीत पंचेचाळीस लाख क्विंटल साखर...सांगली : जिल्ह्यात यंदा १५ सहकारी व खासगी...
`मृत पक्ष्यांत नाही ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
मुंबईकडे झेपावणार `लाल वादळ’ नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
नाशिक जिल्ह्यात पीककर्जाची प्रतीक्षाचनाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक...
अण्णा आंदोलनाच्या निर्णयावर ठाम नगर : ‘‘अण्णा, तुमचे वय पाहता तुम्ही उपोषण करू...
चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे रखडले २८...चंद्रपूर ः धानाला हमीभावासोबतच बोनस दिला जात आहे...
गडचिरोलीत अतिवृष्टिग्रस्तांसाठी...गडचिरोली ः जिल्ह्यात जून ते ऑक्‍टोंबर दरम्यान...
बीज बँक चळवळ देशभर व्हावी ः राहीबाई...अकोले, जि. नगर ः पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील...
विकासाची दारे यशवंतरावांंमुळे खुली :...कोल्हापूर : महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून...
माहूरच्या कुंडातील पाणी सर्वोत्तमनांदेड ः ‘गोदावरी नदी संसद’ परिवारामार्फत नांदेड...
जगभरातील कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी...माळेगाव, जि. पुणे ः शेतकऱ्यांना जगभरातील कृषी...
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...