agriculture news in marathi, strawberry plantation starts, satara, maharashtra | Agrowon

महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

सातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीस वेग आला असून ५० ते ६० टक्के लागवड झाली आहे. पावसामुळे लागवडीचा कालावधी पुढे गेला असला, तरी एकट्या महाबळेश्वर तालुक्यात अडीच हजार एकर, तर इतर तालुक्यांत साधारणपणे एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड होण्याची शक्‍यता आहे. 

सातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीस वेग आला असून ५० ते ६० टक्के लागवड झाली आहे. पावसामुळे लागवडीचा कालावधी पुढे गेला असला, तरी एकट्या महाबळेश्वर तालुक्यात अडीच हजार एकर, तर इतर तालुक्यांत साधारणपणे एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड महाबळेश्वर तालुक्‍यात होते. त्यानंतर जावळी, वाई, कोरेगाव, सातारा व पाटण या तालुक्‍यांत लागवड कमी- अधिक प्रमाणात केली जाते. प्रत्येक वर्षी साधारणपणे ५ सप्टेंबर दरम्यान स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ होतो. मात्र, या वर्षी सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह इतर तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाल्याने या काळात लागवड करता आली नाही. तसेच, आॅक्टोबर महिन्याच्या सुरवातीस पाऊस होता. मागील आठ ते दहा दिवसांपासून स्ट्रॅाबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे.

आतापर्यंत ५० ते ६० टक्के लागवडीचे काम पूर्ण झाले असून, आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. लागवड काळ पुढे गेला असल्याने स्ट्रॉबेरी हंगामावर परिणाम होणार आहे. लागवड प्रक्रिया एक महिना पुढे गेल्याने दिवाळीत मिळणारी स्ट्रॉबेरी आता डिसेंबर- जानेवारी महिन्यात मिळणार आहे. याचा काही प्रमाणात का होईना, पण दरावर परिणाम होणार आहे. या हंगामात महाबळेश्वर तालुक्यात अडीच हजार एकर, तर इतर तालुक्यांत साधारणपणे एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरीची लागवड होण्याची शक्‍यता आहे. मात्र, रोपांची संख्या यावर लागवडीचे क्षेत्र निश्चित होणार आहे. 

पावसामुळे रोपांचे नुकसान
महाबळेश्वर तालुक्यात जास्त पाऊस येत असल्याने मातृवृक्षांपासून होणारी रोपेनिर्मिती काही प्रमाणात हरितगृहामध्ये होते. तसेच उर्वरित रोपेनिर्मिती वाई, जावळी तालुक्यात अजूनही केली जाते. ही रोपेनिर्मिती खुल्या शेतात केली जाते. या वेळी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रोपांची कमरतता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...