Agriculture news in marathi strawberry in problem due to cloudy weather in Mahabaleshwar taluka | Agrowon

महाबळेश्‍वर तालुक्यात मंदी, ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बाजारपेठेतील आर्थिक मंदी उत्पादित मालाला अडसर ठरत आहे. ढगाळ हवामानाने फळावर डाग पडले आहेत.  हा माल विक्रीला जात नाही. त्यात शेतकरीही बाहेर बाजारपेठेत पाठवणारा माल दर्जेदार भरत नाहीत. त्याचाही तोटा होत आहे. 
- बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, अखिल भारतीय स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशन

वातावरणातील बदल स्ट्रॉबेरीच्या मुळावर उठला आहे. ढगाळ वातावरणाने आणि फळाला उष्णता मिळत नसल्याने त्यातील ब्रिक्‍स (ग्लुकोज) वाढत नाहीत. त्यामुळे या मालाला खरेदीदार कंपन्या नापसंती दाखवत आहेत.  
- किसन भिलारे, अध्यक्ष,  महाबळेश्वर सहकारी फुले भाजीपाला खरेदी विक्री संघ.

भिलार, जि. सातारा : जागतिक बाजारपेठेतील मंदी, सातत्याने ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादन असूनही मागणी कमी आणि दरातील तफावत, यामुळे महाबळेश्वर तालुक्‍यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. 

तालुक्‍यातील लिंगमळा, मेटगुताड, अवकाळी, भिलार, गुरेघर या परिसरातील स्ट्रॉबेरीबरोबरच खिंगर, राजपुरी बरोबरच तळदेव आणि कुंभरोशी परिसरातही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या वर्षी स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु, वातावरणातील बदल, ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ऐन हंगामात माल उशिरा मिळाला. त्यामुळे उत्पादित मालाला बाजारपेठेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर बहुतांशी वेळी ढगाळ हवामान राहिल्याने उत्पादनावर परिणाम झाला. 

स्ट्रॉबेरी दिवसाला ५० ते ६० टन उत्पादित होते. यापैकी एक क्रमांकाचा बराचसा माल हा स्थानिक पाचगणी, महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटकांना वितरित होतो. २० टन माल हा बेंगलोर, मुंबई, पुणे, कलकत्ता या ठिकाणी पाठवला जातो. यातील उरलेला एक व दोन नंबरचा ३५ ते ४० टन माल हा येथील स्थानिक कंपन्या, सोसायट्या व स्थानिक व्यापारी जाम, सिरप, जेली, ज्यूस यासाठी खरेदी करतात. 

यंदा जैन कंपनीने भिलारकडे माल खरेदीसाठी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची भिस्त सोसायट्या, स्थानिक कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर आहे. परंतु, स्थानिक जाम, जेली कंपन्यांनीही जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे कमी प्रमाणात माल खरेदी सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...