agriculture news in marathi, strawberry season become late due to rain, satara, maharashtra | Agrowon

पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

मी  सहा वर्षांपासून अर्धा एकरावर स्‍ट्रॉबेरीची लागवड करतो. यंदा गणेशोत्सवादरम्यान लागवड केली होती. मात्र, सातत्याने झालेल्या पावसाने १० गुंठेच पीक चांगले राहिले. याचे आता उत्पादन सुरू झाले असून, रोज साधारण ४-५ किलो उत्पादन हाती येत आहे. गेल्या वर्षी याच हंगामात हे उत्पादन दररोज २० ते २५ किलो होते. सध्या १५० ते २०० रुपये दर मिळत आहे.

- गणेश बोचरे, कुसूर, ता. जुन्नर, जि. पुणे. 

पुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीच्या लागवडी लांबणीवर पडल्याने हंगाम किमान दोन महिने लांबणार आहे. केलेल्या लागवडीचे पावसामुळे नुकसान झाल्याने काही शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली आहे. यामुळे डिसेंबरमध्ये नाताळसाठी विशेष मागणी असलेल्या स्ट्रॉबेरीची आवक कमी आणि दर वाढण्याची शक्यता देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे बाजार समितीमध्ये साधारण दिवाळी दरम्यान स्ट्रॉबेरीची आवक सुरू होते. मात्र यंदा दिवाळी संपून महिना झाली तरी जिल्ह्यातील आवक सुरु झालेली नाही. पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, बारामती आणि सासवड परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड होते. साधारण गणेशोत्सवादरम्यान ही लागवड होते. मात्र यंदा गणेशोत्सवा दरम्यान झालेल्या पावसामुळे केलेल्या लागवडी वाया गेल्या.

काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भितीने लागवडी लांबवल्या. त्यामुळे आता १५ दिवसांपासून लागवडी सुरू झाल्या असून, याचे उत्पादन डिसेंबरअखेर तुरळक प्रमाणात सुरू होईल, अशी माहिती स्ट्रॉबेरीचे प्रमुख अडतदार युवराज काची यांनी दिली.  सध्या केवळ महाबळेश्‍वर परिसरातून ५०० किलो आवक सुरू असून, हिच आवक गतवर्षी सुमारे २ टनांपर्यंत होती. गेल्या वर्षी प्रतिकिलोला १०० ते १५० रुपये असणारा दर सध्या १५० ते ३०० रुपये आहे. नाताळमध्ये विशेष मागणीमुळे आवक कमी झाल्यास दर ४०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे काची म्हणाले.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...