स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

या स्ट्रॉबेरी हंगामात क्षेत्रात कडक्याचा थंडीमुळे काहीसा उत्पादनावर परिणाम झाला होता. मात्र हंगामाच्या सुरवातीपासून दर समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांना हंगाम चांगला राहिला आहे. - गणपत पार्टे, अध्यक्ष श्रीराम फळप्रकिया सहकारी संस्था, भिलार.
स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात
स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

सातारा (प्रतिनिधी) ः महाबळेश्वर इतर तालुक्यातील स्ट्रॉबेरी हंगाम जवळपास आटोपला आहे. कडक्याची थंडी व वन्यप्राण्यांकडून झालेले नुकसानीचा अपवाद वगळता हंगाम समाधानकारक ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक ठरला.  राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणले जातात. ग्रीन हाउसमध्ये या मातृरोपांद्वारे लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली जाते. ही रोपे वेळत आल्याने या हंगामात लागवड वेळेत झाली. महाबळेश्वर तालुक्यात साधारणपणे २३०० ते २५०० एकर तर जावली, वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यांत सुमारे एक ते दीड हजार अशी साडेतीन हजार एकरांवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. वेळेत लागवडीमुळे हंगामही वेळेत सुरू झाला होता. सुरवातीपासून दर समाधानकारक राहिल्याने दर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये तीन ते चार वेळा कडक्याचा थंडी पडल्याने स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले होते.  सध्या महाबळेश्वर तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचा हंगाम ९० टक्के संपला असून, पाच टक्के शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांचा हंगाम सुरू राहणार आहे. उर्वरित टक्के हंगाम जूनपर्यंत चालेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्री-कुंलिग यंत्रणा तसेच रिपर व्हॅनमुळे या हंगामात मोठ्या प्रमाणात स्ट्रॅाबेरी दूरवरच्या बाजारपेठेत पाठवली गेली आहे. यामुळे दर चांगला मिळण्यास मदत झाली असल्याचे शेतकरी सांगत आहे. हंगामाच्या सुरवातीस प्रतिकिलो २५० ते ३०० हंगामच्या मध्यावर १०० ते १५० तसेच अंतिम टप्पात ३५ ते ४० रुपये दर मिळाला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात बहुतांशी माल प्रक्रियेसाठी पाठवला जातो.   थंडीचा परिणाम  जिल्ह्यात डिसेंबर, जानेवारी महिन्यांत कडाक्याची थंडी पडली होती. सर्वाधिक तापमानाची घसरण महाबळेश्वर तालुक्यात नोंद झाली होती. याचा परिणाम काहीसा स्ट्रॅाबेरीला बसला आहे. पाने तसेच फळे तडकल्याने नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून स्ट्रॅाबेरीचे नुकसान करण्यात आले होते. हे अपवाद वगळता हंगाम सुरळीत पार पडला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com