महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी हंगामास प्रारंभ

strawberry
strawberry

सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्‍वरसह अन्य तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगाम सुरू झाला आहे. मागील चार दिवसांपासून थंडी वाढल्याने ती स्ट्रॉबेरी पिकाकरिता उपयुक्त ठरणार आहे. सध्या महाबळेश्‍वर तालुक्‍यातून प्रतिदिन ४० ते ४५ टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे. फ्रेश स्ट्रॉबेरीला १४० ते १५० रुपये किलो दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड झाली. महाबळेश्‍वर तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरीचे पीक घेतले जाते. यानंतर जावळी, वाई, खटाव, सातारा, पाटण या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात स्ट्रॅाबेरी लागवड होते. यंदा रोप निर्मितीसाठी युरोपातून १६ ते १७ लाख मातृरोपे आयात करण्यात आली होती. हरितगृहात या मातृरोपांद्वारे लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली गेली. या हंगामात स्ट्रॉबेरीची मातृरोपे वेळेत आल्याने लागवडीसाठीची रोपे वेळेत तयार झाली होती. सप्टेंबर माहिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता. लागवडीच्या काळात महाबळेश्‍वरसह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले. यामुळे काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली.  महाबळेश्‍वर तालुक्यात २५०० एकर तर इतर तालुक्यांत एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड झाली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासून स्ट्रॅाबेरी हंगामास सुरवात झाली आहे. सध्या महाबळेश्‍वर तालुक्‍यातून प्रतिदिन ४० ते ४५ टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे. फ्रेश स्ट्रॅाबेरीला १४० ते १५० रुपये किलो दर मिळत आहे. मात्र लागवडीचे घटलेले क्षेत्र तसेच इतर नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न हाती येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com