Agriculture news in Marathi, The strength of the Mahayuti increased in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

सातारा ः जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिकंली असली तरी, महायुतीचे चार उमदेवार विजयी झाले असल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. काँग्रेस आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण तर महायुतीकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, महेश शिंदे हे निवडून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बाळासाहेब पाटील यांना ४९ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे. 

सातारा ः जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिकंली असली तरी, महायुतीचे चार उमदेवार विजयी झाले असल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. काँग्रेस आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण तर महायुतीकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, महेश शिंदे हे निवडून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बाळासाहेब पाटील यांना ४९ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे. 

शिवेंद्रराजेची चौथ्यांदा बाजी 
जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या लढतीत शिवेंद्रसिंहराजेंनी चौथ्यांदा तब्बल ४२ हजार ४२४ मतांनी विजय मिळविला. सातारा मतदारसंघ यापूर्वीही भोसले घराण्याकडे होता. शिवेंद्रसिंहराजे यांना एक लाख १८ हजार पाच मिळाली. तर दीपक पवार यांनी ७४ हजार ५८१ मते मिळाली आहेत. 

पृथ्वीराज चव्हाणांची गड राखला 
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नऊ हजार १३० मताधिक्‍याने दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली. श्री. चव्हाण यांना ९२ हजार २९६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे अतुल भोसले यांना ८३ हजार १६६, तर बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना २९ हजार ४०१ मते मिळाली. अखेर पृथ्वीराज चव्हाणांनी नऊ हजार १३० मताधिक्यांनी विजय मिळवत गड राखला. 

बाळासाहेब पाटील यांना मताधिक्य 
कऱ्हाड उत्तर विधानसभेचे पाचव्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी विक्रमी ४९ हजारांचे मताधिक्‍य घेत कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. मतमोजणीअखेर ४९ हजार २१५ इतके मताधिक्य मिळाले. मतमोजणीत आमदार पाटील यांना एक लाख ५०९, मनोज घोरपडे यांना ५१ हजार २९४, तर धैर्यशील कदम यांना ३९ हजार ७९१ मते मिळाली. 

मकरंद पाटील यांची विजयाची हॅटट्रिक 
वाई विधानसभा मतदारसंघातील भोसले व पाटील घराण्यांच्या पारंपरिक लढतीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी भाजपचे उमेदवार माजी आमदार मदन भोसले यांच्यावर ४३ हजार ६४७ मात करून विजयाची हॅटट्रिक केली. त्यांना एक लाख ३० हजार ४८६, तर त्यांचे प्रतिस्पर्धी  भाजपचे उमेदवार मदन भोसले यांना ८६ हजार ८३९ मते मिळाली. सर्व फेरीत मकरंद पाटील यांनी आघाडी घेतली. मकरंद पाटील यांना एक लाख ३० हजार ४८६ तर मदन भोसले यांना ८६ हजार ८३९ मते मिळाली. 

पाटणमध्ये शंभू ‘राज' 
पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांना सलग दुसऱ्या वेळी पराभवाचा धक्का देत विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी १४ हजार २२६ चे मताधिक्‍य घेऊन पाटणला पुन्हा शंभू‘राज’च सिद्ध केले. आमदार देसाई यांना एक लाख पाच हजार ९६५ तर सत्यजितसिंह पाटणकर यांना ९१ हजार ७३९ मते मिळाली.  

माणमध्ये पुन्हा जयकुमार गोरे 
माण मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत आमदार जयकुमार गोरे यांनी ३०४३ मतांनी बाजी मारत एकवटलेल्या विरोधकांना अस्मान दाखवले. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे प्रयत्न अपुरे पडले. तर शेखर गोरेंना शिवधनुष्य पेललेच नाही. तिसऱ्यांदा हॅटट्रिक साधण्याची किमयाही गोरेंनी केली. गोरेंनी ३०४३ मतांनी बाजी मारली. जयकुमार गोरे यांना ९१ हजार ४६९, प्रभाकर देशमुख यांना ८८ हजार ४२६ तर शेखर गोरे यांना ३७ हजार ५३९ मते मिळाली.

दीपक चव्हाण यांची विजयी हॅटट्रिक 
फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांचा ३० हजार ९८१ एवढ्या मताधिक्‍याने पराभव केला. या विजयाने फलटण विधानसभा मतदारसंघावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचेच प्रभुत्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दीपक चव्हाण यांना एक लाख १७ हजार ६१७ तर दिगंबर आगवणे यांना ८६ हजार ६३६ मते मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
लाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...
औरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...