agriculture news in marathi Strengthed the family income by expanding the vermicompost business | Agrowon

गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण बनवले भक्कम

माणिक रासवे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ बबनराव देशमुख यांनी अत्यंत कमी खर्चात गांडूळ खतनिर्मिती व विक्री व्यवसाय यशस्वी केला आहे. वर्षाला सुमारे ५० टन खताची विक्री ते करतात. सोबत अंजिराची व्यावसायिक शेती व रोपवाटिका याद्वारे त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.

लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ बबनराव देशमुख यांनी अत्यंत कमी खर्चात गांडूळ खतनिर्मिती व विक्री व्यवसाय यशस्वी केला आहे. वर्षाला सुमारे ५० टन खताची विक्री ते करतात. सोबत अंजिराची व्यावसायिक शेती व रोपवाटिका याद्वारे त्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.

सीताराम ऊर्फ बबनराव देशमुख यांची लोहगाव (ता. जि. परभणी) शिवारात दोन एकर जमीन आहे. विहिरी, बोअरची व्यवस्था आहे. पावसाचा अनियमितपणा, अल्प प्रमाण यामुळे सातत्याने दुष्काळी स्थिती उद्भवत आहे. या परिस्थितीत दोन एकरांतून संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालविण्याएवढे उत्पन्न पुरेसे होत नव्हते. मग सीताराम यांना सालगडी, जायकवाडी कालव्यावर पहारेकरी, शेतमजूर अशी अंगमेहनतीची कामे करावी लागली. आपल्या शेतीत ते कापूस, सोयाबीन आदी पिके घेत.

ॲग्रोवनने दिली दिशा

 • सन २०१२-१२ च्या दरम्यान कृषी विभागाच्या योजनेंतर्गत सिमेंटचे हौद बांधून गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. त्याच्या वापरातून जमिनीची सुपीकता वाढू लागली.
   
 • घरच्या शेतात वापरून शिल्लक खताची विक्री सुरू केली. दरम्यान सीताराम यांची यशकथा ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद येत व्यवसायाला अधिक चालना मिळाली.

व्यवसायाचा विस्तार

 • उंबराच्या दाट सावलीच्या झाडाखाली खतनिर्मिती. त्यासाठी पालापाचोळा, जनावरांचे शेण यांचा वापर.
   
 • निर्मिती प्रक्रियेत सुधारणा करताना १०० बाय ५० फूट जागेचा वापर. त्यात सिमेंट पोल रोवले आहेत. लोखंडी पट्ट्याच्या सांगड्यावर नेट लावून खतनिर्मितीसाठी निवारा. त्याभोवती लोखंडी जाळी.
   
 • दोन म्हशी, एक गाय. त्यांचे शेण अपुरे पडत असल्याने प्रति ट्रॅाली अडीच हजार रुपयांप्रमाणे परभणी शहरातून दरवर्षी सुमारे ७० ट्रॅाली शेणखताची खरेदी.
   
 • पूर्वी वर्षाला १२ चे २० बॅग्ज एवढेच गांडूळखत तयार व्हायचे. आता एकहजार बॅग्ज म्हणजे सुमारे ५० टन खताची (एक बॅग म्हणजे ५० किलो) निर्मिती व विक्री होते.
   
 • प्रति क्विंटल ८०० रुपये दर.
   
 • परभणी जिल्ह्यासह शेजारील बीड, यवतमाळ, अमरावती, नागपूर आदी भागांतून गांडूळखतास मागणी.
   
 • सुमारे २०० ग्राहक शेतकऱ्यांचे नेटवर्क.

गांडूळ कल्चरची विक्री

 • आत्माअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकरी गट व अन्य शेतकऱ्यांना गांडूळ कल्चरची प्रति किलो ४०० रुपये दराने दरवर्षी १५० ते २०० किलो विक्री
   
 • परभणीसह लातूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतून मागणी
   
 • नव्याने खतनिर्मिती करू इच्छिणाऱ्यांना शेतकऱ्यांना सीताराम मार्गदर्शन करतात

अंजिराची यशस्वी शेती

 • लोहगाव शिवारातील शेतकऱ्याकडे वाट्याने कामास असताना अंजीर शेतीची माहिती मिळाली. या भागात अंजीर लागवड फारशी नसल्याने प्रयोग करण्याचे ठरविले.
   
 • सन २०१४ मध्ये दिनकर वाणाची एक एकरात लागवड केली. सुमारे २५६ झाडे आहेत. दरवर्षी तीन टनांपर्यंत उत्पादन मिळते. हंगाम फेब्रुवारी- मार्च ते जून -जुलै या कालावधीत चालतो. परभणी शहरात १०० रुपये प्रति किलो दराने स्वतः घरपोच विक्री करतात. शहरातील रसवंतीगृहाना ठोक स्वरूपात ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.
   
 • रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. शेतात तयार केलेल्या निविष्ठा तसेच गांडूळखतांवर पोसलेल्या दर्जेदार गोड अंजिरांना ग्राहकांची पसंती असते. पक्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. ते थांबविण्यासाठी बागेवर जाळी लावली आहे.

रोपवाटिका

 • सन २०१७ मध्ये रोपवाटिका सुरू केली आहे. छाटणीपूर्वी काही झाडांवर गुटीकलम बांधले जाते. पहिल्या वर्षी दोन हजार रोपे तयार केली. प्रति रोप ५० रुपये याप्रमाणे विक्री स्थानिक शेतकरी, पुणे, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना केली. गेल्यावर्षी चार हजार कलमे तयार करून विक्री साधली.
   
 • नारायणगाव केव्हीके यांनाही रोपे पुरवली आहेत. उल्लेखनीय शेतीसाठी अंजीर परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परभणी शाखेतर्फे गौरव करण्यात आला आहे.

पूरक उद्योगांचा समर्थ आधार

 • दुष्काळी स्थितीत अंजीर तसेच एक एकरांतील भाजीपाला उत्पादनावर परिणाम होतो. आर्थिक अडचणी येतात. मात्र, गांडूळखत व कल्चर विक्री, रोपवाटिका या पूरक उद्योगांतून उत्पन्नाचे स्रोत सक्षम केले आहेत.
   
 • दोन मुलींचे विवाह केले. दोन मुले आणि एक मुलगी शिक्षण घेत आहे. पत्नी वनमालाताई यांची शेती, गांडूळ खतनिर्मितीसाठी खंबीर साथ मिळते.
   
 • कधीकाळी शेतमजूर असलेल्या सीताराम यांच्याकडे आज शेती व पूरक व्यवसायांतील कामांसाठी एक सालगडी, दोन मजूर आहेत.
   
 • लोहगाव शिवारातील एका शेतकऱ्याची दोन एकर शेती भाडेतत्त्वावर तर कौडगाव शिवारात पाच एकर शेती बटईने केली आहे. आगामी काळात रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मितीचा अजून विस्तार करायचा आहे.

ॲग्रोवनमुळेच घर बांधले

 • काही वर्षांपूर्वी सीताराम यांची यशकथा ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी गांडूळ खतनिर्मितीची केवळ सुरुवात होती. ॲग्रोवनच्या माध्यमातून चारशेहून अधिक फोनकॉल्स आले. साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या रकमेचा आधार घेऊन शेतात घर बांधले.
   
 • पुढील काळात अंजिराची बाग दुष्काळात सापडली. अशावेळी बाग जगवण्यासाठी पैसा आवश्‍यक होता. बॅंक बाकी कशावरच कर्ज द्यायला तयार होईना. अशावेळी ॲग्रोवनमुळे बांधलेले घर पुन्हा मदतीला धावले. ते तारण ठेवले. त्यातून एक लाख रुपये कर्ज मिळाले. त्यातून अंजीर बाग चांगली जोपासली. त्यापुढील वर्षी ही बाग, गांडूळखत आदींच्या माध्यमातून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.ॲग्रोवनसह कृषी विद्यापीठाचीही मोठी मदत झाल्याचे सीताराम सांगतात.

संपर्कः सीताराम देशमुख- ९९२२१७९३४०


फोटो गॅलरी

इतर सेंद्रिय शेती
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची...पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू...
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे...जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल...
निंबोळी अर्काची निर्मिती, वापरसध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या...
गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण...लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ...
ऊस पाचटातून वाढवा सेंद्रिय घटकऊस पाचटापासून कंपोस्ट खत तयार करता येते. ऊस तुटून...
जमीन सुपीकता, उत्पादकतावाढीसाठी...जमिनीतून एकापाठोपाठ विविध अन्नधान्ये पिके...
मशागतीद्वारे पीक अवशेषाचे व्यवस्थापनपीक अवशेष कुजून त्याद्वारेदेखील जमिनीमध्ये कर्ब...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
कंपोस्ट खते बनवण्याच्या पद्धतीबदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
जमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...
जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...
आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...
दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...
समजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...
जमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...
वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...