महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः बालविकासमंत्री ठाकूर

महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः बालविकासमंत्री ठाकूर
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः बालविकासमंत्री ठाकूर

अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, असे महिलांबद्दल बोलले जाते. आपल्यातील अशा शक्‍तीला जागृत करून कठोर प्रसंगावेळी प्रतिकार करण्याची तयारी ठेवा’, असा सल्ला महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला.  वैदर्भीय महिला बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी आयोजित विभागीय प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या सोमवारी (ता. १७) बोलत होत्या. विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची या वेळी उपस्थिती होती.  ॲड. ठाकूर म्हणाल्या की, समाजातील विखारी प्रवृत्तीच्या बाबतीतही महिलांनी सहनशील न राहता किंवा चुप्पी न साधता अनुचित प्रकाराच्या तक्रारी वेळोवेळी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या वेळी त्यांच्या हस्ते उत्कृष्ट बचत गटांचा सन्मानही करण्यात आला. विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असलेल्या बचत गटांतील उपक्रमांची माहिती दिली. बचत गटांद्वारे कर्ज घेण्याचे आणि परतफेडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोठमोठ्या उद्योजकांना लाजविणारा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. उद्योजकांकडून कर्ज घेतले जाते, परंतु त्याच्या भरपाईबाबत मात्र ते उदासीन असतात. महिला बचत गट त्याला अपवाद ठरतात, असे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात महिलांचा सन्मान महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या वेळी दोन महिलांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असेही ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com