agriculture news in marathi, ' Strengthening societies through Human Development Mission | Agrowon

मानव विकास मिशनद्वारे सोसायट्यांचे बळकटीकरण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018
अकोला : मानव निर्देशांकवाढीसाठी राबवल्या जात असलेल्या मानव विकास मिशनच्या माध्यमातून कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी जळगाव जामोद तालुक्याला सुमारे एक कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे अटल महापणन विकास योजनेअंतर्गत ११ सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाचा भाग म्हणून १६ लाख ५० हजार रुपये दिले जात अाहेत. यातून सोसायटी स्तरावर मिरची पावडर, पिठाची गिरणी आदी उद्योग उभारले जाणार अाहेत.        
 
अकोला : मानव निर्देशांकवाढीसाठी राबवल्या जात असलेल्या मानव विकास मिशनच्या माध्यमातून कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी जळगाव जामोद तालुक्याला सुमारे एक कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे अटल महापणन विकास योजनेअंतर्गत ११ सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाचा भाग म्हणून १६ लाख ५० हजार रुपये दिले जात अाहेत. यातून सोसायटी स्तरावर मिरची पावडर, पिठाची गिरणी आदी उद्योग उभारले जाणार अाहेत.        
 
मानवी विकास निर्देशांक कमी असल्याने बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात मानव विकास मिशनची अंमलबजावणी केली जात अाहे. या मिशनअंतर्गत विविध उपक्रम सध्या सुरू अाहेत.
राज्यात अटल पणन योजनेअंतर्गत सोसायट्यांचे बळकटीकरणाचे काम सुरू झाले अाहे. सहकार खात्याने पुढाकार घेत मानव विकास मिशनमधून सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव दिला होता. यानुसार हा निधी मंजूर करण्यात अाला. जळगाव जामोद तालुक्यातील ११ सोसायट्या निवडण्यात येणार अाहेत.

रेशीमसह विविध उद्योगांनाही पाठबळ
या तालुक्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेशीम उद्योग उभारणीसाठी ४३ लाखांचा निधी मंजूर झाला अाहे. तसेच, सर्जिकल कॉटनसाठी आणि तालुकास्तरीय शेतमाल विक्री केंद्राच्या निर्मितीसाठी प्रत्‍येकी २० लाख, सफेद मुसळी पावडर बनविण्यासाठी
८ लाख १९ हजार, हळद व मिरची पावडर तयार करण्यासाठी १३ लाख ५४ हजार आणि एलईडी बल्ब प्रकल्पासाठी १२ लाख ४७ हजार असे एकूण एक कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मानव विकासचे अायुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नुकतीच दिली अाहे. 

इतर बातम्या
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल...बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी...फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी...
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर...रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या...
वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे...अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य...
नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी...नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या...
नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३०...येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच...यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट...सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण...नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल...
भाजप सत्ता स्थापन करणार नाही :...मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण...
श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण...श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात...
`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...