गडहिंग्लजमध्ये ठिय्या आंदोलन
गडहिंग्लजमध्ये ठिय्या आंदोलन

गडहिंग्लजमध्ये ठिय्या आंदोलन

कोल्हापूर ः मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात गडहिंग्लज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालयासह तालुक्‍यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. गडहिंग्लज भडगाव पुलावर आंदोलकानी सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी केली. या ठिकाणी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली.

बंदमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले. जयसिंगपूर येथील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. नीता माने यांच्याहस्ते व इतर सर्व समाजाच्या प्रतिनिधींसह राजाराम महाराज, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर शहरातील दसरा चौकात दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच राहिले.

परिसरातील विविध गावातील मराठा समाजातील बांधवांनी दसरा चौकात येऊन या आंदोलनास उपस्थिती लावली. दरम्यान मंगळवारच्या बंदमुळे विस्कळीत झालेली बसवाहतूक बुधवार सकाळपासून पूर्वपदावर आली. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक बसेसच्या काचावर जाळ्या लावून बससेवा सुरू करण्यात येत होती. कोल्हापूर ते मुंबईकडे जाणाऱ्या बसगाड्या मात्र बंद ठेवण्यात आल्याची माहिती एस.टी.च्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com