Agriculture news in marathi strict campaign against stocks of essential commodities | Agrowon

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात धडक मोहीम

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रीम भाववाढ करू पाहणाऱ्या व्यापारी व दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेश करण्यासाठी जिल्ह्यात पथके नेमण्यात आलेली आहेत, या पथकांनी शनिवारी (ता. २८) ३७ दुकानांवर धाडी घालत २ दुकाने सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रीम भाववाढ करू पाहणाऱ्या व्यापारी व दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेश करण्यासाठी जिल्ह्यात पथके नेमण्यात आलेली आहेत, या पथकांनी शनिवारी (ता. २८) ३७ दुकानांवर धाडी घालत २ दुकाने सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या नियोजनाखाली राबवलेल्या स्टींग ऑपरेशनच्या धडक मोहिमेत धान्य वितरण अधिकारी यांनी १०, तहसीलदार नाशिक यांनी ७, तहसीलदार दिंडोरी यांनी १० व तहसीलदार सुरगाणा यांनी ५ अशा एकूण ३२ किराणा दुकानदार , होलसेल व रिटेल दुकानदार यांची तपासणी या पथकांमार्फत करण्यात आली. त्यात नाशिक येथील सुभाष नगरातील होलाराम ॲण्ड सन्स , नाशिकरोड व कालीका मंदिर येथील स्वस्त धान्य दुकान क्र. १२४ यांची दुकाने तपासणी पथकामार्फत सील करण्यात आलेली आहेत. 

जिल्ह्यातील संचारबदीच्या स्थितीचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व कृत्रीम भाववाढ करणाऱ्या किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांच्या विरुद्ध कठोर कारवाई पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. 

जादा किमतीने विक्री केल्यास कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. तसेच कोणत्याही किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांनी साठेबाजी किंवा जादा किमतीस वस्तुची विक्री करू नये, तसे केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...