Agriculture news in marathi Strict closure of agricultural vendors in Varada | Agrowon

वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

वऱ्हाडात २५०० पेक्षा अधिक कृषी व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.  त्यामुळे कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे. 

अकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे नोंदविण्यात येऊ नये, गुन्हे नोंदविण्याबाबतचा अन्यायकारी निर्णय तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी कृषी व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. वऱ्हाडात २५०० पेक्षा अधिक विक्रेते यात सहभागी झाले. त्यामुळे कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला आहे. 

कृषी व्यावसायिक बंदला अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यातील स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.  त्यानुसार सर्व विक्रेते सहभागी झाले.  शुक्रवारी (ता.१०) एकाही विक्रेत्याने दुकान उघडले नाही. सध्या या  भागात काही ठिकाणी पेरणी, तर काही भागात सोयाबीन, मका पिकावर किडींसाठी फवारणीचे काम सुरु आहे. यासाठी अनेकांना खते, किडनाशकांची गरज आहे. 

नेमका याच काळात बंद सुरु झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनांनी सर्वांना संदेश दिले आहेत. शिवाय, या बंदच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनालाही निवेदन देत अवगत करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया..
राज्यस्तरीय संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व ५६८ विक्रेते स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. या आंदोलनाबाबत गुरुवारी (ता.९) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून हा बंद सुरु झाला. शासनाने विक्रेत्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने लक्ष देऊन आमच्या समस्या सोडवाव्या.  
- मोहन सोनोने,  कार्याध्यक्ष, अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघटना.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...