माथाडी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी ः मंत्री डॉ. कुटे

माथाडी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी ः मंत्री डॉ. कुटे
माथाडी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी ः मंत्री डॉ. कुटे

पुणे ः राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच माथाडी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी डॉ. बाबा आढाव यांना दिले. माथाडी कायदा आणि कामगारांच्या विविध प्रश्‍नांबाबत डॉ. आढाव यांनी गुरुवारी (ता. २०) मंत्रालयात मंत्री डॉ. कुटे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. 

डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर मंत्री डॉ. कुटे यांची भेट घेऊन, प्रश्‍न तात्काळ मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा, डॉ. बाबा आढाव यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी कामगार आयुक्त राजीव जाधव, सहआयुक्त रविराज इलवे उपस्थित होते. 

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी मुंबई माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, बळवंतराव पवार, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मगदूम, सहचिटणीस हनुमंत बहिरट, अप्पा खताळ, खजिनदार नवनाथ बिनवडे, संघटक संतोष नांगरे, गोरख मेंगडे, गंगाराम कोळेकर आदि उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com