सोलापुरात आजपासून ३१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन 

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्‍यातील ३१ गावांमध्ये १६ जुलै ते २६ जुलै या दरम्यान कडक लॉकडाउनचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.
Strict lockdown in 31 villages in Solapur from today
Strict lockdown in 31 villages in Solapur from today

सोलापूर : कोरोनोचा शिरकाव ग्रामीण भागातही वाढत असून, त्याला अटकाव करण्यासाठी सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्‍यातील ३१ गावांमध्ये १६ जुलै ते २६ जुलै या दरम्यान कडक लॉकडाउनचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत घरपोच दूध व्रिकीसाठी परवानगी दिली आहे. तसेच हॉस्पिटल, मेडिकल सुरू राहतील. बाकी अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवण्यासह लोकांनाही घराबाहेर न पडण्याची सूचना या आदेशात करण्यात आली आहे. कृषी सेवा केंद्रांना ठराविक वेळेसाठी परवानगी दिली आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी, तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा, भोगाव या गावांमध्ये तर दक्षिण सोलापुरातील कुंभारी, विडी घरकूल, वळसंग, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बोरामणी, होटगी, लिंबीचिंचोळी, बक्षिहिप्परगा, कासेगाव, उळेगाव, तांदुळवाडी आणि मोहोळ तालुक्‍यातील कुरुल, कामती बु. व कामती खुर्द या गावांसह बार्शी, वैराग आणि अक्कलकोटमधील ३१ गावे यामध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. या गावात संचारबंदीची अंमलबजावणी कडक असणार आहे. या गावांमधील लॉकडाउन काळातील प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवण्यासाठी प्रांताधिकारी तथा स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्‍ती करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यांना दररोजचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूर शहरातही लॉकडाउन असल्याने बाजार समितीचे व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

लॉकडाऊनचं असं असणार स्वरुप 

  • कोणत्याही व्यक्‍तीस कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही; घरगुती गॅस देणाऱ्यांकडे असावा गणवेश 
  • कडक संचारबंदी काळात संबंधित गावांमधील बॅंका पूर्णपणे बंद राहतील 
  • स्वस्त धान्य दुकाने, किरणा दुकाने, मटन, अंडी, चिकन विक्रीची दुकाने, हॉटेल, धार्मिक स्थळांसह अन्य आस्थापनाही बंदच राहतील 
  • विद्युत सेवा, अग्निशामक सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राद्वारे परवानगी 
  • पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरला परवानगी असेल; कृषी व कृषीविषयक सर्व उपक्रम चालू राहतील 
  • खते, कीटकनाशके, औषधे, बि-बियाणे, चारा दुकाने चालू राहणार; सकाळी आठ ते दुपारी दोनची दिली वेळ 
  • आरोग्य, महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, अग्निशामक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र बंधनकारक 
  • -खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा वेळेत सुरू राहतील 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com