agriculture news in marathi Strict restrictions apply in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 एप्रिल 2021

परभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

परभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फळे, भाजीपाला मार्केट तसेच शहरात विविध ठिकाणी होणारी फळे भाजीपाला विक्री, किराणा दुकाने आदी  शुक्रवार (ता.३०) पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व बॅंका नागरिकांसाठी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सुरु राहतील, असे आदेशात नमूद केले. 

जिल्ह्यातील आस्थापनांवर होणारी नागरिकांची गर्दी आणि कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ, यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर सुरवातीला शनिवार (ता.१७) ते गुरुवार (ता.२२) पर्यंत आणि त्यानंतर रविवार (ता.२५) पर्यंत फळे, भाजीपाला  विक्री, किराणा सामान दुकाने, बेकरी, मिठाई आदी खाद्य पदार्थांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

अद्यापही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२४) काढण्यात आलेल्या सुधारित आदेशानुसार फळे, भाजीपाला मार्केट, विविध ठिकाणी फळे, भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, बेकरी, मिठाई खाद्य पदार्थांची दुकाने शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

भाजीपाला विक्री ठप्प 

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये शहरातील विविध नागरी वसाहतीमध्ये फळे-भाजीपाला विक्रीसाठी मुभा देण्यात आली. त्यामुळे  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु गेल्या आठवडाभरापासून निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे फळे- भाजीपाला मार्केटसह अन्य ठिकाणची भाजीपाला विक्री ठप्प आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...