सातारा जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागासह शहरात सर्व व्यवहार ठप्प ठेवत कडकडीत बंद पाळत आला. बळिराजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी ‘रस्ता रोको’ करत बंदमध्ये सहभागी झाले.
Strictly 'closed' in Satara district
Strictly 'closed' in Satara district

सातारा ः नव्या कृषी कायद्यांच्या विरोधासाठी देशभर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागासह शहरात सर्व व्यवहार ठप्प ठेवत कडकडीत बंद पाळत आला. बळिराजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी ‘रस्ता रोको’ करत बंदमध्ये सहभागी झाले.

सातारा, कऱ्हाड, वाई, पाटण, कोरोगाव, फलटण, दहीवडीसह सर्व प्रमुख शहरांत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. सातारा शहरात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

खंडाळा शहरात बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. फलटण शहरात आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, सचिन सूर्यवंशी-बेडके, मिलिंद नेवसे आदींच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिर येथे जमलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फलटण शहरातून शांततेच्या मार्गाने फेरी काढली व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.

कऱ्हाड येथे बळिराजा व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येत मोटर सायकल रॅली काढून प्रातांधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले. या सर्व संघटनांनी तीनही कायदे रद्द करावेत, अथवा सर्व संघटना एक एकत्र येऊन राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com