agriculture news in marathi, Strike of damages at Pandharpur | Agrowon

धरणग्रस्तांचा पंढरपुरात बेमुदत ठिय्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

सोलापूर : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून (ता. १२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. राज्यातील नऊ जिल्ह्यांत एकाच वेळी हे आंदोलन सुरू आहे.

सोलापूर : धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून (ता. १२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. राज्यातील नऊ जिल्ह्यांत एकाच वेळी हे आंदोलन सुरू आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तहसीलदार मधुसूदन बर्गे व जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी माधवी चव्हाण यांनी भेट दिली. आमच्या स्तरावरील सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पण जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः या मागण्यांची दखल घेऊन बैठक लावत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. त्यामुळे हे आंदोलन आणखी काही दिवस तरी चालण्याची शक्यता आहे.

उजनी, कन्हेर, कोयना धरणग्रस्तांचे बहुतांश पुनर्वसन पंढरपूर उपविभागामध्ये करण्यात आले. पण ते फक्त नावालाच झाले आहे, आजही आमचे प्रश्न कायम आहेत, याकडे अनपट यांनी लक्ष वेधले. पण आता माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले. 

या आहेत मागण्या...

  •    धरणाचे पाणी समन्यायी वाटप व्हावे. 
  •    धरणग्रस्तांच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची       स्थापना करावी.
  •    वहिवाट अडथळा दूर करावा.
  •    शेतीला पाटाचे पाणी मिळावे.
  •    नवीन शर्त कमी करून मिळावी.
  •    भूखंड व जमिनीचे वाटप पूर्ण करावे.
  •    गावठाणाची मोजणी करून लेआउट       दुरुस्त करावे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...