agriculture news in marathi, strike of traders continue in Akola APMC, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अकोला बाजार समितीत व्यापारी-अडत्यांचा बंद कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

अडते-व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या बंदबाबत अाम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. बाजार तातडीने सुरू करण्याचे प्रयत्न अाहेत. ई-नाम प्रणालीनुसार कामकाज झाले तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल. त्यादृष्टीने बाजार समिती प्रयत्न करीत अाहे.
- सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीनुसार व्यवहाराची अंमलबजावणी केली जात अाहे; परंतु ई-नामप्रणालीमध्ये एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असा ठपका ठेवत बाजार समिती सचिवांनी एका अडत व्यावसायिकाला नोटीस बजावल्याने व्यापारी-अडत्यांनी असहकार सुरू केला अाहे. यामुळे बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासून खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झालेले अाहेत. बुधवारी (ता. २५) मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी सार्वत्रिक बंदमुळे बाजार समिती बंद होती. गुरुवारी (ता. २६) व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा असताना मात्र खरेदी-विक्री झाली नाही.

नॅशनल अॅग्रिकलचर मार्केट अर्थात ई-नाम प्रणालीमध्ये एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने बाजार समिती सचिवांनी एका अडत्याला नोटीस बजावली. परिणामी अडते-व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला अाहे. बुधवारी सकल मराठा समाजाने बंद पुकारल्याने बाजार बंदच होता. मात्र अाता गुरुवारी (ता. २६)सुद्धा व्यवहार होतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.

शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देश पातळीवरील एक बाजार, या संकल्पनेवर अाधारित राष्ट्रीय कृषी बाजार (नॅशनल अॅग्रिकलचर मार्केट- नाम) प्रणाली सुरू करण्यात अाली अाहे. देशातील मुख्य कृषी बाजारांना संगणकीय प्रणालीद्वारे जाेडण्यात येत अाहे. या याेजनेची राज्याभरात टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी सुरू अाहे. त्यानुसार अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात याेजनेस प्रारंभ करण्यात आला.

या प्रमाणीनुसार काम न झाल्याचे दिसताच मागील अाठवड्यात बाजार समितीने एका अडत्यास नाेटीस बजावली. त्यानंतर २१ जुलैला कारवाई करीत अडत्याचा परवाना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा अादेश बजावला. परवाना नियम व सूचनांचे उल्लंघन करून व्यापार करीत असल्याचा ठपका या अादेशात ठेवण्यात अाला होता. दुसरीकडे ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत अडते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. ई-नाम प्रणालीबाबत बाजार समिती प्रशासानाकडे शासन अादेशाची प्रत मागितली हाेती. त्यानुसार अडते-व्यापाऱ्यांना कृषी पणन मंडळाच्या पत्राची प्रत देण्यात अाली. यात अडत्यांनी खरेदीदाराचे भाव घेऊन पाेर्टलवर टाकावे, असे नमूद नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई याेग्य नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांनी करीत खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकलेला आहे.

यामध्ये तोडगा काढण्यासाठी बाजार समितीकडून पुढाकार घेतला जात असून, अद्याप त्यात यश अालेले नाही. परिणामी चार दिवसांपासून व्यवहार बंद झालेले अाहेत.

धान्याची नासाडी
गेल्या काही दिवसांत अकोल्यात सातत्याने पाऊस होत अाहे. बाजार समितीत असलेल्या काही धान्याला पावसाचे पाणी लागल्याने धान्याचे नुकसान होत अाहे. काही पोत्यांमधून थेट अंकूर बाहेर पडल्याचे दिसून अाले.

 


इतर बातम्या
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये...परभणी ः जिल्ह्यामध्ये परराज्यातून तसेच इतर...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...
पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा...पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसाननांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...