कागदपत्रांसाठी उडतेय येडशीतील शेतकऱ्यांची तारांबळ

पीकविमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाई सरसकट देण्यात यावी. जाचक अटीत सोयाबीन नुकसानीचे फोटो, सातबारा उतारा व आठ ‘अ’ या सह ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, हे रद्द करून सरसकट विमा द्यावा. - मारुती मेटे, शेतकरी
कागदपत्रांसाठी उडतेय येडशीतील शेतकऱ्यांची तारांबळ
कागदपत्रांसाठी उडतेय येडशीतील शेतकऱ्यांची तारांबळ

येडशी : पावसाने झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईसाठी अर्ज भरून मागणी केली आहे; पण या अर्जासोबत जाचक अटींची कागदपत्रे मागविण्यात आल्याने शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी तारांबळ उडत आहे.

यंदाही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. पिके चांगली आली; पण ही सोयाबीनसह इतर पिके काढणीसाठी आली. दररोज थोडा का होईना पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरात सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

संतोष नकाते, यशवंत नलावडे, अशोक देशमुख, सुधाकर नकाते या शेतकऱ्यांच्या शेतात अधिकाऱ्यांनी सोयाबीनची पाहणी केली. दोन दिवसांत ६०० च्या वर अर्ज आले असून आणखी अर्ज भरून येणे चालू असल्याचे मत कृषी सहायक अधिकारी एल. जी. मुंढे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com