Agriculture news in Marathi Strive to enable the sugar industry ः Balasaheb Patil | Agrowon

साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील ः बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला सातत्याने विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असते. प्रत्येक वर्षी नवीन प्रश्‍न आणि नवीन आव्हाने असतात. त्याला सामोरे जात उद्योग सक्षम करण्यासह दूरगामी उपाययोजनांसाठी प्रयत्नशील असणार असल्याचे नवनियुक्त सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

मंत्री झाल्यानंतर पाटील यांनी सहकार व पणन विभागाची पहिली आढावा बैठक साखर संकुल येथे घेतली. यानंतर त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. 

पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला सातत्याने विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असते. प्रत्येक वर्षी नवीन प्रश्‍न आणि नवीन आव्हाने असतात. त्याला सामोरे जात उद्योग सक्षम करण्यासह दूरगामी उपाययोजनांसाठी प्रयत्नशील असणार असल्याचे नवनियुक्त सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

मंत्री झाल्यानंतर पाटील यांनी सहकार व पणन विभागाची पहिली आढावा बैठक साखर संकुल येथे घेतली. यानंतर त्यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. 

पाटील म्हणाले, ‘‘साखर उद्योगाचे अनेक प्रश्‍न आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनही उसाला चांगले दर मिळण्याची मागणी असते. प्रत्येक साखर कारखाना उद्योग नफ्यात आणण्यासाठी आणि उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो. मात्र, इतर उद्योगांप्रमाणे साखर उद्योगाचे नसते. या उद्योगाला एक चक्र असून, दरवर्षी विविध प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असते, यामुळे दरवर्षी नवनवीन आव्हाने असतात.

उसाची एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी तर मराठवाड्यात दुष्काळामुळे उसाची टंचाई आहे. यामुळे अनेक कारखाने कमी क्षमतेने सुरू आहेत. याही परिस्थितीत उसाचे पेमेंट देण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत. मात्र, एफआरपी देताना कारखान्यांना कोणतीही सवलत देण्याची शासनाची भूमिका नाही. 

मंत्री म्हणून पहिल्यांदाच काम करत असलो तरी साखर कारखाना संघामध्ये काम केले आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून आहे. हे प्रश्‍न सामंज्यस्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

साखर निर्यातीसाठी केंद्राची योजना आहे. काही कारखाने निर्यातीचे धाडस करतात. त्यांना निर्यात अनुदानही चांगले मिळते. मात्र, अनेक कारखान्यांनी निर्यातीसाठी धाडस करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणार आहे.
- बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...