जमीन सुपीकतेच्या जागरूकतेसाठी प्रयत्न करा : रविशंकर चलवदे

Strive for Land Fertility Awareness: Ravishankar Chalwade
Strive for Land Fertility Awareness: Ravishankar Chalwade

नांदेड : ‘‘गेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांमध्ये जमीन आरोग्यपत्रिकेबाबत केलेल्या जाणीव-जागृतीमुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी झाला आहे. जमीन आरोग्यपत्रिकेनुसार सुपीकता निर्देशांकाचे गावनिहाय नकाशे तयार करावेत. कृषी सहायकांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांमध्ये जमीन सुपीकताविषयक जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी तर्फे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन २०१९-२० अंतर्गत ‘जमीन आरोग्य पत्रिका अभियान’ या विषयावर कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये चलवदे बोलत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ बी. आर. गजभिये, उपविभागीय कृषी अधिकारी बी. पी. कदम (किनवट), एम. जी. सोनटक्के (देगलूर), कृषी उपसंचालक वाय. व्ही. घुगे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी अर्चना गुंजकर, तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख (कंधार), एस. आर. शिंदे (देगलूर) गायकवाड, जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींची उपस्थिती होती.

गजभिये म्हणाले, ‘‘जमिनची सुपीकता टिकविणे काळाची गरज आहे. त्यासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवावा.’’देशमुख यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार हळद लागवड, उत्पादकता वाढ यावर सविस्तर माहिती दिली.

गुंजकर यांनी जिल्ह्यातील उपक्रमांची माहिती देत अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत आवाहन केले. कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय चिंतावार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कृषी सहायक अमित राठोड, पालेपवाड, चव्हाण, घुमनवाड,पाटील, सोनवणे आदींनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com