Agriculture news in marathi, Strive to save the pomegranate garden in Atpadi | Agrowon

डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पावसामुळे मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यामुळे फळावर डाग पडू लागतात. ते वाचण्यासाठी खास डाळिंबांसाठी बनवलेल्या कागदाने बाग झाकून घेतली.
- राहुल गायकवाड, डाळिंब उत्पादक शेतकरी,आटपाडी

आटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम आणि मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात डाळिंबाचे नुकसान झाले. उरल्यासुरल्या डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरूच आहे. ज्या बागा वाचल्या, त्या सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागावर कागद आणि कापडाचे आच्छादन केले आहे. त्यामुळे डाळिंबाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होणार आहे. 

आटपाडी तालुक्यात बहुतांश शेतकरी मृग हंगामात जून आणि जुलै महिन्यात डाळिंबाचा हंगाम धरतात. यावर्षी जुलै महिन्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यावेळी ऊन पडले नसल्यामुळे बागांना अपेक्षित कळी निघाली नाही. त्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. बागांत पाणी साचून राहिले. शेताला पाझर लागले. त्यामुळे डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. बागा पूर्ण वाया गेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी निचरा होणाऱ्या बागांत कुठेतरी थोडे डाळिंब आले आहेत. त्याच्यावरही तेलकट रोगाने हल्ला चढवला आहे. 

मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके पडत आहेत. त्यामुळे फळावर ऊन चट्टा पडू लागला आहे. बुरशीजन्य रोग आणि इतरही डाग पडू लागले आहेत. ही फळे बाजारपेठेत खरेदी केली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली डाळिंबे वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

बागा तणानी भरल्या आहेत. ऊन चटटा आणि बुरशीजन्य रोगापासून वाचवण्यासाठी बनवलेल्या कागदी कपड्याने बागा झाकण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच भांगलणीचीही कामे गतीने सुरू आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...