agriculture news in marathi, stromy rain prediction in North Maharashtra | Agrowon

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. दिवसभर असलेल्या उष्ण व दमट हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. पावसाची उघडीप कायम राहिल्यास उन्हाचा चटका वाढून, ऑक्टोबर हीट तापदायक ठरण्याची शक्यता आहे. तर आज (ता. ३०) उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिकमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. दिवसभर असलेल्या उष्ण व दमट हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. पावसाची उघडीप कायम राहिल्यास उन्हाचा चटका वाढून, ऑक्टोबर हीट तापदायक ठरण्याची शक्यता आहे. तर आज (ता. ३०) उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिकमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

कच्छचे आखात आणि परिसरावर असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज (ता. ३०) गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गुजरातला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणातही जोरदार सरींची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिकमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोलीत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे ५३ मिलिमीटर, भंडारा ४७, तुमसर २८, गोंदियातील आमगाव येथे ६३ मिलिमीटर, गोंदिया ७८, गोरेगाव ७५, तिरोडा ४१, कामठी ३९, काटोल २३, मौदा २३, रामटेक २७ मिलिमीटर, कोकणातील रायगड जिल्ह्याच्या सुधागड पाली येथे २६ मिलिमीटर, तर औरंगाबादमधील गंगापूर येथे ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिल्याने, तसेच अंशत: ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा हळूहळू वर सकायला लागला आहे. सध्या तापमान सरासरीपेक्षा कमी असले, तरी उन्हाचा चटका बसू लागला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे सर्वाधिक ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

रविवारी (ता. २९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.१ (-१.४), जळगाव ३०.६ (-४.१), कोल्हापूर २९.१ (-१.०), महाबळेश्‍वर १९.५ (-४.३), मालेगाव ३१.६ (-०.९), नाशिक २७.९ (-३.२), सांगली २८.५ (-२.७), सातारा २७.८ (-१.५), सोलापूर ३१ (-१.४), अलिबाग ३०.३ (-०.५), डहाणू ३२.१ (०.६), सांताक्रूझ ३२ (०.५), रत्नागिरी ३०.६ (०.४), औरंगाबाद २९.२ (-२.२), परभणी ३१.८ (-०.९), नांदेड ३३ (-०.२), अकोला ३१.९ (-१.५), अमरावती ३०.४ (-३.२), बुलडाणा २८ (-२.४), ब्रह्मपुरी ३२.६ (-०.२), चंद्रपूर ३३.६ (०.२), गोंदिया ३० (-३.०), नागपूर ३१.५ (-१.८), वर्धा ३२ (-०.७), यवतमाळ ३१.५ (-०.७).


इतर अॅग्रो विशेष
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...