agriculture news in marathi, Strong movement in Khedgah for sugarcane bill | Agrowon

केन ॲग्रोच्या ऊस बिलासाठी कडेगावात तीव्र आंदोलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

कडेगाव, जि. सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तात्काळ द्यावी, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटना शनिवारी (ता. ६) येथे तहसील कार्यालयासमोर रणरणत्या उन्हात तब्बल पाच तास धरणे आंदोलन केले.

कडेगाव, जि. सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तात्काळ द्यावी, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटना शनिवारी (ता. ६) येथे तहसील कार्यालयासमोर रणरणत्या उन्हात तब्बल पाच तास धरणे आंदोलन केले.

केन ॲग्रो कारखान्यावर काही दिवसांपूर्वी बळिराजा शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले होते. तेव्हा कारखाना प्रशासनाने कडेगाव तहसीलदार यांच्यासमोर संघटनेला १ ऑक्टोबरपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देतो असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, कारखाना व्यवस्थापनाने अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नाहीत. त्यामुळे बळिराजा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार अर्चना शेटे, कारखान्याचे संचालक धनंजय देशमुख, कारखाना अधिकारी यांच्यासह बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्यासह शेतकरी यांच्यात उर्वरित शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी जोरदार चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांनी आपली कैफियत प्रशासनासमोर मांडली.

या वेळी धनंजय देशमुख म्हणाले, सोमवारपर्यंत (ता. १५) उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही, असे आश्वासन तहसीलदार यांचेसह सर्वांसमोर दिले. त्यानंतर संघटना व शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन स्थगित केले. या वेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, केन ॲग्रोचे संचालक धनंजय देशमुख, तहसीलदार अर्चना शेटे, नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांच्यासह कडेगाव, पलूस तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

केन ॲग्रो साखर कारखाना व्यवस्थापनाने उर्वरित शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी कडेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी तहसीलदार यांच्यासमोर कारखाना प्रशासनाने सोमवारी (ता. १५) उर्वरित शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. जर सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. तर मंगळवारी (ता. १६) सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळिराजा शेतकरी संघटना व शेतकरी आत्मदहन करणार आहे.- बी. जी. पाटील, अध्यक्ष - बळिराजा शेतकरी संघटना

 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...