Agriculture news in marathi, Strong opposition to PMRDA's development plan at Dhamantek | Page 4 ||| Agrowon

धामणटेक येथे ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यास तीव्र विरोध

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

राजगुरूनगर, जि. पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास एसईझेड परिसरातील गावांनी तीव्र विरोध केला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत.

राजगुरूनगर, जि. पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित केलेल्या विकास आराखड्यास एसईझेड परिसरातील गावांनी तीव्र विरोध केला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत.

एसईझेड परिसरातील रेटवडी, गोसासी, निमगाव, दावडी, कनेरसर, पूर, वरुडे, गाडकवाडी, वाफगाव या गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक, शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून, धामणटेक येथे विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. एसईझेड परिसरातील गावांमध्ये औद्योगिकरणामुळे नागरीकरण वाढत आहे. म्हणून भविष्याच्या दृष्टीने या भागात रहिवासी व व्यावसायिक झोन होणे आवश्यक असताना, पीएमआरडीएने फक्त ग्रीन, ग्रीन-१ व ग्रीन-२, असे झोन टाकले आहेत.

या निर्णयामुळे स्थानिकांना भविष्यात उद्योग व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होणार आहे. म्हणून लोकांचा आराखड्यास विरोध आहे. एसईझेड परिसरातील गावांचे झोन बदलण्यात यावेत आणि टाकलेली चुकीची आरक्षणे बदलण्यात यावीत, अशी मागणी लोकांनी केली.

प्रास्ताविक मारुती गोरडे यांनी केले. विजयसिंह शिंदे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. या वेळी गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, दावडीचे सरपंच संभाजी घारे, निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे, पूरचे माजी सरपंच संदीप गावडे, वरुड्याचे उपसरपंच अण्णा चौधरी, गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, उपसरपंच नंदकुमार सुर्वे, बी. टी. शिंदे, बबनराव शिंदे, दिलीप माशेरे आदींनी या वेळी विचार मांडले.
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...