सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार निदर्शने

सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यासाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने गुरुवारी (ता.२६) माथाडी मंडळासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
Strong protests by Sangli Hamal Panchayat
Strong protests by Sangli Hamal Panchayat

सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यासाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने गुरुवारी (ता.२६) माथाडी मंडळासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. हमाल, मापाडी, महिला माथाडी कामगार या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात देशातील दहा प्रमुख संघटनांनी संविधान दिनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपास पाठिंबा देण्यासाठी हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी माथाडी मंडळासमोर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. 

हमाल पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, कामगारविरोधी लेबर कोड त्वरित मागे घ्या. सर्व कामगार कायदे पुनर्स्थापित करा. शेतकरीविरोधी तीन कायदे त्वरित मागे घ्या.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या सूत्रांनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देणारे कायदे करा. प्रस्तावित व सुधारित वीज विधेयक त्वरित मागे घ्या. कोविड काळात प्राप्तीकर न भरणाऱ्या सर्व कुटुंबांना ७५०० रुपये मासिक निर्वाह भत्ता द्या. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण थांबवा. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी मान्यता द्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com