agriculture news in marathi, strong rain in East-Vidarbha | Agrowon

पूर्व विदर्भात दमदार पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

नागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे अपेक्षित असताना पूर्वहंगामी मोसमी वारे तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभाग सांगत आहे. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार होत ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला. 

नागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे अपेक्षित असताना पूर्वहंगामी मोसमी वारे तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभाग सांगत आहे. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार होत ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला. 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच नागपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांच्या काही भागांत दमदार, तर काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ३० ते ३५ मि.मी. आहे. त्यामुळे इतक्‍या कमी पाण्यावर पेरणीची कामे आटोपण्याचा विचार शेतकरी करीत आहे. परंतु पुढे पावसाने खंड दिल्यास उगवण झालेले बियाणे वाढणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी दिला.

हवामान विभागासह विविध पर्यावरणतज्ज्ञांनी  २० ते २५ जून या कालावधीत पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. परंतु तो पेरणीयोग्य नसल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांना मात्र यापुढील काळात पेरणीयोग्य दमदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. 

तुरळक तर काही भागांत दमदार पाऊस होत असला, तरी तो काही काळ बरसतो आणि त्यानंतर पुन्हा उघडीप देतो. त्यातून जमिनीचे तापमानही अद्याप कमी होऊ शकले नाही. यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यात पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. त्याकरिता हा पाऊस पोषक ठरला आहे. धानपट्ट्यातील रोवण्या मात्र पुरेशा पावसाअभावी खोळंबल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...