बागलाण तालुक्यात दमदार पाऊस

बागलाण तालुक्यात दमदार पाऊस
बागलाण तालुक्यात दमदार पाऊस

नाशिक : बागलाण तालुक्यातील पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी थोड्या फार पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या. मात्र, पावसाचा ताण पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. गुरुवारी (ता. २५) झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गुरुवारी निताने, लाडुद, जायखेडा या परिसरांत दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते.  बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात भीषण पाणीटंचाई सतावत आहे. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १०३ मि.मी. पाऊस झाला आहे. गत वेळेपेक्षा तो ५० मि.मी.ने कमी आहे. तालुक्यातील केळझर व हरणबारी या दोघाही मध्यम प्रकल्पांमध्ये गत वर्षी याच काळात १० दशलक्ष घनफूट इतका जलसाठा होता. तर यंदा मात्र दोन्ही धरणे कोरडीठाक आहेत. परिणामी, तालुक्यात आजही ३९ टँकरद्वारे ५१ गावे व खेड्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू आहेत. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे चणकापूर व केळझर धरणे कोरडीठाक असल्याने आजही सटाणा शहरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा हेात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com