Agriculture news in marathi Strong return of rains in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

नाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बुधवार (ता.५) पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

नाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बुधवार (ता.५) पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

दमदार पावसाने अनेक ठिकाणी नाले व ओढ्यांना पाणी भरून वाहिले. जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यासह पेठ, कळवण, चांदवड, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तालुक्यातही अनेक भागात झाला. त्यामुळे पिकांना मोठा आधार झाला आहे. 

प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मका व कापूस ही पिके मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर पिके अडचणीत आली होती. प्रामुख्याने जिल्ह्यात निफाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात इगतपुरी, पेठ सुरगाणा, त्र्यंबकेश्वर पावसाने हजेरी लावली. मात्र, पाऊस वेळेवर न झाल्याने या भागात अजूनही पिकांचे नियोजन कोलमडले आहे. तर, काही भाजीपाला लागवडी या पावसामुळे बाधित झाल्या आहेत.

पावसाने खंड दिल्यानंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात लागवडी खोळंबल्या होत्या. त्यामुळे या पावसाने पुन्हा एक संजीवनी दिली आहे. मात्र, असे असले तरी चालू वर्षी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...