Agriculture news in Marathi Strong winds, thunder, lightning and rain | Agrowon

जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. २१) कोकणात बहुतांशी ठिकाणी, उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. २१) कोकणात बहुतांशी ठिकाणी, उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. तर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दोन तीन दिवसांपासून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला असतानाच रविवारी (ता. १९) सायंकाळनंतर चंद्रपूर, गोंदियासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. २०) सकाळपासूनच राज्यात ढगाळ हवामान होऊ लागले होते. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती.

उद्या (ता. २१) कोकणातील सर्वच जिल्हे, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (एल्लो अलर्ट)
कोकण :
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार 
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. 
विदर्भ : गोंदिया, गडचिरोली

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा(एल्लो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र :
नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर
विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर.


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...