agriculture news in marathi, structure for restrict Humani, Maharashtra | Agrowon

हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी आयुक्तालय
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हुमणीने केलेले आक्रमण रोखण्यासाठी कृषी राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. ‘हुमणीग्रस्त उसाचे गाळप तातडीने करावे,’ असा महत्त्वपूर्ण सल्लादेखील कृषी आयुक्तालयाने साखर कारखान्यांना दिला आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या  बैठकीत हुमणीच्या संकटाचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. हा इशारा खरा ठरला असून, राज्यात सध्या ११ लाख हेक्टरपैकी मोठ्या प्रमाणात हुमणीचे आक्रमण झाले आहे, असे कृषी खात्यानेच स्पष्ट केले आहे. 

पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हुमणीने केलेले आक्रमण रोखण्यासाठी कृषी राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. ‘हुमणीग्रस्त उसाचे गाळप तातडीने करावे,’ असा महत्त्वपूर्ण सल्लादेखील कृषी आयुक्तालयाने साखर कारखान्यांना दिला आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या  बैठकीत हुमणीच्या संकटाचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. हा इशारा खरा ठरला असून, राज्यात सध्या ११ लाख हेक्टरपैकी मोठ्या प्रमाणात हुमणीचे आक्रमण झाले आहे, असे कृषी खात्यानेच स्पष्ट केले आहे. 

‘‘राज्यात हजारो हेक्टरपेक्षाही जास्त ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखानदारांनी शेतकी खात्याच्या मदतीने गावनिहाय बैठका सुरू कराव्यात,’’ अशीही सूचना श्री. पवार यांनी केली होती. हुमणीविरोधात शेतकी खात्याने म्हणजे साखर कारखान्याच्या शेतकी विभागाने की राज्य शासनाच्या कृषी खात्याने गावनिहाय बैठका घ्याव्यात, असा पेच काही कारखान्यांना पडला होता. 

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विस्तार संचालक विजयकुमार घावटे, उपसंचालक सुभाष घाडगे यांनी मात्र एकत्रितपणे राज्यातील हुमणीग्रस्त क्षेत्राचा आढावा घेत राज्यस्तरीय कार्यशाळादेखील घेतली आहे. त्यामुळे कोणत्या विभागाने काय उपाय करायचा हे स्पष्ट करून देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘‘साखर आयुक्तालय, कृषी आयुक्तालय, व्हीएसआय, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच हुमणी तज्‍ज्ञांची आम्ही एकत्रित कार्यशाळा घेतली आहे. यात हुमणीला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले आहे. याशिवाय रासायनिक नियंत्रणाऐवजी जैविक पद्धतीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. तथापि, या सर्व नियोजनात साखर आयुक्तालय कितपत पुढाकार घेते यावर कृती आराखड्याचे यश अवलंबून राहील,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

असा आहे हुमणी नियंत्रण आराखडा

  • हुमणीग्रस्त उसाचे गाळप लवकर करणे 
  • रासायनिक ऐवजी जैविक नियंत्रणावर भर
  • विविध प्रयोगशाळांमध्ये जैवनियंत्रकाचे उत्पादन घेणे
  • नियंत्रणासाठी अनुदानावर विविध साहित्यांचे वाटप करणे
  • हुमणी वेचण्यासाठी मोहिमा काढणे
  • ऊस ऊत्पादक क्षेत्रात नांगरटीची कामे दिवसा घेणे

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...