पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू 

शेतकऱ्यांना खरीप पीकविमा तत्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संघर्ष दिंडीला शुक्रवारी (ता. २९) सिरसाळा येथून सुरुवात झाली. या वेळी शेतकऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. हातात लाल झेंडा घेऊन शेतकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत.
पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू  The struggle for crop insurance continues
पीकविम्यासाठी संघर्ष दिंडी सुरू  The struggle for crop insurance continues

परळी, जि. बीड : शेतकऱ्यांना खरीप पीकविमा तत्काळ मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संघर्ष दिंडीला शुक्रवारी (ता. २९) सिरसाळा येथून सुरुवात झाली. या वेळी शेतकऱ्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. हातात लाल झेंडा घेऊन शेतकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत.  खरीप २०२०चा पीकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी अखिल भारतीय किसान सभेने जुलै २०२१ ते आजतागायत परळी, बीड, पुणे व मुंबई या ठिकाणी विविध आंदोलने केली आहेत. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल, असे अश्वासन दिले. सोबतच विमा कंपनीला निर्देश देऊन देखील, २०२१ संपत आले तरी अद्याप २०२०ची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे किसान सभेच्या सिरसाळा ते बीड या चार दिवसांच्या पीकविमा संघर्ष दिंडीचा प्रारंभ शुक्रवारी सिरसाळा येथून झाला. शेतकऱ्यांना २०२०चा पीकविमा नाही, २०२१च्या विम्याच्या पंचनाम्याचे गोंधळ, अतिवृष्टीमुळे जाहीर झालेली तुटपुंजी मदत आणि त्यातच बीड जिल्ह्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार व विमा कंपनी यांच्यातील दावे-प्रतिदाव्यात मात्र शेतकरी भरडला जात आहे. यावर धोरणात्मक निर्णय होत नसल्याने प्रचंड रोष आहे. या वर्षी सरकार व विमा कंपनीने आमची दिवाळी हिरावून घेतलीय. आता आम्हाला या वर्षीची दिवाळी सरकार दरबारी साजरी करू द्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीला अनुसरूनच किसान सभेने जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, बीड जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषिमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांची भेट घेउन किसान सभेने मागील चार महिन्यांपासून पीकविमा मिळावा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. 

...असा असेल दिंडीचा प्रवास  सिरसाळा येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शेतकऱ्यांची पीकविमा संघर्ष दिंडी सुरू झाली आहे. पहिला मुक्काम शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी तेलगाव येथे होईल. माजलगाव व धारूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघर्ष दिंडी दुसरा मुक्काम वडवणी जवळील मैदा-पोखरी येथे करेल. वडवणी तालुक्यातील आणि बीड तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन ३१ तारखेला रात्री बीडजवळ येऊन थांबेल, १ नोव्हेंबरला सकाळी तेथून बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सिरसाळा येथुन सुरू होणाऱ्या पायी संघर्ष दिंडीत किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ. रूस्तुम माने यांच्यासह शेकडो शेतकरी लाल झेंडा हातात घेउन मार्गक्रमण करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com