बीडमध्ये विम्यासाठी संघर्ष दिंडी

बीड : शेतकऱ्यांना खरीप २०२० व २१ चा पीकविमा परतावा मिळावा व इतर मागण्यांसाठी सिरसाळा येथून महाराष्ट्र किसन सभेच्या नेतृत्वात निघालेल्या पीकविमा संघर्ष दिंडीने सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोठ्या शेतकरी या दिंडीत सहभागी झाले होते.
Struggle for insurance in Beed
Struggle for insurance in Beed

बीड : शेतकऱ्यांना खरीप २०२० व २१ चा पीकविमा परतावा मिळावा व इतर मागण्यांसाठी सिरसाळा येथून महाराष्ट्र किसन सभेच्या नेतृत्वात निघालेल्या पीकविमा संघर्ष दिंडीने सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोठ्या शेतकरी या दिंडीत सहभागी झाले होते.

खरीप २०२०चा पीकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभेने जुलै २०२१ ते आजतागायत परळी, बीड, पुणे व मुंबई या ठिकाणी विविध आंदोलने केली. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल, असे आश्वासन दिलेले आहे.मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले होते. परंतु जोवर लिखित न्यायपूर्ण निर्णय मिळत नाही तोवर माघार घेतली जाणार नसल्याचे का अजय बुरांडे यांनी सांगितले. मोर्चेकरी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून होते.दिंडीत किसान सभा नेते कॉ. अॅड. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, काॅ. काशिनाथ सिरसट, कॉ. विष्णुपंत देशमुख, कॉ. पाडुरंग राठोड, जगदिश फरताडे, कॉ. ओम पुरी, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. सुभाष डाके आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com