agriculture news in marathi, The struggle to save papaya garden | Agrowon

पपई बागा वाचविण्यासाठी धडपड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

एक एकरावर पपई लावलेली आहे. जुने तीन बोअर कोरडे पडले. चौथा पाचशे फूट खोल बोअर घेतला. त्याचे पाणी साठविण्यासाठी छोटे शेततळे तयार केले. आजवर दोन लाख रुपये खर्च झाला आहे. फळधारणा झाल्यापासून पाणी कमी पडत असल्याने नुसता खर्च निघणार नाही.
- नवनाथ अंभोरे, शेतकरी, सातेफळ, जि. हिंगोली.
 

हिंगोली : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. या परिस्थितीत पपई बागा वाचविण्यासाठी सातेफळ (ता. वसमत) येथील शेतक-यांचे प्रयत्न सुरू आहेत. अपुरे पाणी, तसेच उन्हामुळे पाने होरपळत आहेत. फळे परिपक्वतेच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने उत्पादन खर्च निघणेदेखील मुश्कील झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी सिंचनासाठी खात्रीचे पाणी उपलब्ध असलेल्या सातेफळ येथील १० ते १२ शेतकऱ्यांनी यंदा १० ते १५ एकरवर पपईची लागवड केली आहे. दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून ठिंबक सिंचन पद्धतीने पपई बागा जोपासल्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी पडू लागले आहे. त्यात गेल्या १५  ते २० दिवसांपासून या भागातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उन्ह, वेगाच्या वा-यामुळे भिजविलेली जमीन झटकन कोरडी पडत आहे. ओलावा नष्ट झालेल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. 
पपईच्या झाडाची पाने उन्हात होरपळत आहेत.

फळे परिपक्वेच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाणी कमी पडत असल्याने फळाचा आकार, तसेच वजन वाढणे अशक्य झाले आहे. लहान आकाराची फळे झाडावर कोमेजत आहेत. शेतकरी बागा वाचविण्यासाठी नवीन कूपनलिका, छोटे शेततळे खोदत सिंचनाची व्यवस्था करीत आहेत. झाडे जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु पाणी कमी पडत असल्याने पपई  बागांची होरपळ सुरूच आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...